Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 19 : 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री कन्फर्म! कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:24 IST

'बिग बॉस १९'मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री कन्फर्म झाली आहे.

Bigg Boss 19 : टीव्हीवरील अतिशय गाजलेला आणि वादग्रस्त असला तरी लोकांच्या आवडीचा असलेला 'बिग बॉस' हा रिएलिटी शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९'ची नुकतीच घोषणा झाली असून लवकरच नवं पर्व सुरू होणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोच्या यंदाच्या पर्वात कोणते नवीन चेहरे दिसणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'बिग बॉस १९'मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेता 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार आहे. 'तारक मेहता...'मध्ये मिस्टर सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंह 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेणार आहे. टेली चक्करने दिलेल्या रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये गुरुचरण सिंहची एन्ट्री कन्फर्म झाली आहे. पण, अद्याप गुरुचरण सिंह किंवा 'बिग बॉस १९'च्या टीमकडून याबाबत कोणीतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

गुरुचरण सिंहला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत त्याने रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली होती. २००८ मध्ये त्याने या शोमध्ये एन्ट्री घेतली होती. पण, २०१३ मध्ये त्याने मालिका सोडली होती. नंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा २०१४ मध्ये त्याला मालिकेत दाखवलं गेलं. आता 'बिग बॉस १९'मधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार