Join us

Bigg Boss 19: मालतीने पुन्हा रडवलं! तानियाने मानली हार; 'बिग बॉस'च्या घरात मोठा ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:11 IST

मालती आणि तानिया मित्तलमध्ये ३६चा आकडा असल्याचं दिसतं. नॉमिनेशन टास्कमध्येही मालतीने तानियाला स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिलं होतं. त्यामुळे तानिया मित्तलला अश्रू अनावर झाले. आता पुन्हा मालतीने तानियाला रडवलं आहे. 

Bigg Boss 19: मालती चहरने 'बिग बॉस'च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासून घरातील समीकरणं बदलल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासूनच मालतीने तिचा खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. मालती आणि तानिया मित्तलमध्ये ३६चा आकडा असल्याचं दिसतं. नॉमिनेशन टास्कमध्येही मालतीने तानियाला स्विमिंगपूलमध्ये ढकलून दिलं होतं. त्यामुळे तानिया मित्तलला अश्रू अनावर झाले. आता पुन्हा मालतीने तानियाला रडवलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरात यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्य पार पडणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये मालती आणि तानियाची जोडी दिसत आहे. तानिया मालतीला म्हणते, "मी तर तुला आधीपासूनच घाबरत आहे. तुला जे करायचंय ते कर...पहिल्या दिवसापासून तू मला घाबरवायचा प्रयत्न करत आहेस. तुला काय वाटतं मला कळत नाही?". त्यावर मालती तिला "तुला बाहेर जाऊन समजेल की तुला आधीच किती गोष्ट कळायला हव्या होत्या...तुझा खेळ बदल. मी तुझ्या चांगल्यासाठी बोलत आहे. तुझ्याबाबतीत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यामुळे तुझ्या कुटुंबाला वाईट वाटेल", असं उत्तर देते. 

मालतीचं बोलणं ऐकून तानिया मध्येच गेम सोडते आणि हार मानते. "मी हार मानली... तू जिंकलीस..", असं तानिया म्हणते. तानियाने टास्क मध्येच सोडल्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. तानियाबद्दल मालती शहबाजसोबत बोलत आहे की"ती अभिनय करत होती...OMG माझ्या कुटुंबाबद्दल बोलले". त्याचवेळी तानिया झिशानला म्हणते, " मी स्ट्राँग नाही राहू शकतेय...मला खूप चिंता वाटतेय". झीशान तिच्यावर चिडतो आणि तिला समजावतो की  "तिच्या गोष्टींचा तुझ्यावर परिणाम होतो. मग मी सांगितलेल्या गोष्टींचा का होत नाही? तू खूप चांगलं खेळत आहेस. स्वत: मालतीने मला हे सांगितलं आहे". आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19: Malti makes Taniya cry; big drama unfolds!

Web Summary : Malti's wild card entry stirs drama. Malti makes Taniya cry during a captaincy task, leading Taniya to quit, shocking everyone. Zeeshan tries to console her.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार