Join us

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात येणार साऊथची ग्लॅमरस हसीना? अभिनेत्री म्हणाली- "मला शोची ऑफर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:26 IST

'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

Bigg Boss 19: अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय आणि आवडीने पाहिला जाणारा, कायमच चर्चेत असलेल्या 'बिग बॉस' या रिएलिटी शोचा पुढचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

साऊथ अभिनेत्री मालवी मल्होत्रा 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जातंय. बॉलिवूड लाइफशी बोलताना मालवीने 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार की नाही, याचा स्वत:च खुलासा केला आहे. "मला वाटत नाही की मी जाईन. कारण, सध्या माझे बरेच प्रोजेक्ट सुरू आहेत. शिवाय हा शो माझ्या पर्सनालिटीपेक्षा खूप वेगळा आहे. जर मला बिग बॉसची ऑफर मिळाली तर मी नक्कीच विचार करेन", असं मालवी मल्होत्राने सांगितलं. 

दरम्यान, मालवी तिचा आगामी सिनेमा 'जेनमा नक्षत्रम'मुळे चर्चेत आहे. याशिवाय ती एका हॉरर सिनेमाचं शूटिंगही करत आहे. २०१७ मध्ये मालवीने उडान या मालिकेतून पदार्पण केलं होतं. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. तिने हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार