टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९' मध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन ट्विस्ट येत असतात. गेल्या 'वीकेंड का वार' मध्ये अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा याने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. ज्यामुळे घरातील वातावरण खूप बदलले होते. आता लवकरच आणखी दोन नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
'बिग बॉस १९'च्या घरात 'पुढील वाईल्ड कार्ड स्पर्धक कोण असेल' याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. आता गायिका टिया कर आणि अभिनेत्री शिखा मल्होत्रा यांची नावे समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, हा निर्णय शोसाठी गेम चेंजर ठरू शकतो, असं 'बिग बॉस' चाहत्यांचं मत आहे.
टिया कर ही एक प्रसिद्ध गायिका आहे. तर शिखा मल्होत्रा ही एक अभिनेत्री आहे. जी तिच्या स्पष्टवक्त्या आणि सरळ स्वभावासाठी ओळखली जाते. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर टिया आणि शिखा कोणाला पाठिंबा देतील आणि कोणाच्या विरोधात जातील, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आता उद्या होणाऱ्या 'वीकेंड का वार' मध्ये काय घडतं, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.