Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही वासेपूरचे डॉन तर मी पण महाराष्ट्राचा मराठा...", प्रणित मोरेने झीशान कादरीची बोलतीच केली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:46 IST

गँग्स ऑफ वासेपूर फेम झीशान कादरीची प्रणितने त्याच्या स्टाइलने विनोद करत बोलती बंद केली आहे.

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास आहे. या पर्वात मराठमोळा कॉमेडियन असलेल्या प्रणित मोरेने एन्ट्री घेतली आहे. प्रणित मोरेला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. पहिल्या दिवसापासूनच प्रणितने बिग बॉसच्या घरात त्याची जागा बनवायला सुरुवात केली आहे. आता त्याने त्याच्या कॉमेडीने बिग बॉसच्या घरालाच हास्याचा कट्टा बनवून टाकलं आहे. 

बिग बॉसकडून सदस्यांना 'द बीबी शो' हा टास्क देण्यात आला होता. यामध्ये सदस्यांना स्वत:चं टॅलेंट दाखवायचं होतं. या टास्कमध्ये प्रणितने घरातील प्रत्येक सदस्यांवर विनोद करत सदस्यांना हसून लोटपोट केलं. पण हे जोक करण्याबरोबरच प्रणितने घरातील काही सदस्यांना चोख उत्तरही दिलं. गँग्स ऑफ वासेपूर फेम झीशान कादरीची प्रणितने त्याच्या स्टाइलने विनोद करत बोलती बंद केली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

या व्हिडीओमध्ये झीशान कादरी वासेपूरबद्दल बोलताना दिसत आहेत. तसंच प्रणितबद्दलही ते बोलत आहेत. त्याला प्रणितने त्याच्या विनोदातून उत्तर दिलं आहे. "झीशान भाईने गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा लिहिला. हा सिनेमा त्यांनी यासाठी लिहिला कारण ते धनबड इथले आहेत. ते प्रत्येक वेळी वासेपूरच्या गोष्टी सांगत असतात. तिथले गुंडे, तिथले डॉन याबद्दल ते बोलत असतात. जर तुम्ही वासेपूरचे डॉन आहात तर मी पण महाराष्ट्राचा मराठा आहे. जोपर्यंत प्रेमात बोलतोय तोपर्यंत ठिक आहे. नाहीतर मग घरी सोडून येईन", असं म्हणत प्रणितने झीशान कादरीची बोलती बंद केली आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार