Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 19: "तू बाहेर ये, तुझी वाट बघतोय...", सलमान प्रणित मोरेला असं काय बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 21:51 IST

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस.प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाचं १९ पर्व देखील चांगलंच गाजलं.

Bigg Boss 19: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस.प्रत्येक पर्वाप्रमाणे यंदाचं १९ पर्व देखील चांगलंच गाजलं. नेहमीप्रमाणे सुपरस्टार सलमान खान होस्ट करत असलेला हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या या सीझनच्या ट्रॉफिवर आता कोण नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यंदाची थीम ही राजनीतीवर आधारित होती. आज ७ डिसेंबरला या पर्वाचा ग्रॅंड फिनाले पार पडणार आहे. नुकतीच या पर्वाच्या ग्रॅड फिनालेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, सलमान आणि प्रणित यांच्यामधील संवाद चर्चेत आला आहे.

सलमान खान प्रणित मोरेसोबत शोमध्ये चक्क मराठीत संवाद साधतो. आणि एक गोड  तक्रार देखील करतो. तेव्हा सलमान प्रणितची फिरकी घेत म्हणतो, 'प्रणित तू माझ्याबद्दल काही चांगलं बोलला नाही.' त्यावर उत्तर देत प्रणित देत म्हणतो- 'मी चांगलं बोलेन ना.' नंतर सलमान म्हणतो, "तू सर्वांवर जोक मारलेस. पण, तरीही या घरातून तुला प्रेम मिळालं. मेडिकल ट्रिटमेंन्टसाठी तू काही दिवस घराबाहेर होतास. पण,सर्वजण तुझी वाट बघत होते. मग ते तुझ्या टीममधील असो किंवा दुसरं कोणाही असो. आता तू बाहेर ये मी सुद्धा तुझी वाट बघतोय." सलमान असं म्हणताच सेटवर एकच हशा पिकतो.  

या पर्वाच्या अंतिम फेरीत गौरव खन्ना, अमाल मलिक तसेच प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट हे स्पर्धक पोहोचले आहेत. दरम्यान, घरातील ड्रामा, भांडण तसेच स्पर्धकांची मैत्री आणि त्यामुळे समीकरणात झालेले बदल पाहायला मिळाले.  या १८ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त पाच जणांचा निभाव लागला आहे. आता या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss 19: Salman teases Praneet, 'I'm waiting for you outside!'

Web Summary : Salman Khan playfully interacted with Praneet More on Bigg Boss 19, joking about Praneet's comments. He acknowledged Praneet's popularity and the housemates' support during his medical absence. The grand finale features Praneet, Gaurav, and others after overcoming challenges.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजनसलमान खान