Join us

Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 21:44 IST

Bigg Boss 19: 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याच्या नावाचीही चर्चा होती. या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Bigg Boss 19: अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते नवे चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. यामध्ये 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याच्या नावाचीही चर्चा होती. या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

'गँग्स ऑफ वासेपूर'चे लेखक आणि अभिनेता असलेल्या झीशान कादिरने 'बिग बॉस १९'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये त्याने साकारलेली डेफिनेट ही भूमिका गाजली होती. त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधला डेफिनेट आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात गँग बनवणार का? हे पाहण्यात मजा येणार आहे. 

झीशानसोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या तानिया मित्तलनेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. तानियाचे इन्स्टाग्रामवर २.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. ती एक स्पिरिच्युअल स्टोरीटेलर आहे. तिचे रील्सही खूप व्हायरल होतात.   

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारसलमान खान