Join us

अजबच! वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:17 IST

वजन वाढण्याच्या भीतीने तोंडात ब्रश घालून उलट्या करायची अभिनेत्री, म्हणाली-"मी अनेक दिवस उपाशी..."

Ashnoor Kaur: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. यंदाचं  बिग बॉस १९ चं पर्व चांगलंच गाजतंय. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांमध्ये टिकाटीप्पणी,वाद पाहायला मिळत आहेत. अशातच अलिकडेच सलमानच्या "बिग बॉस १९" च्या या सीझनमधील "वीकेंड का वार" एपिसोड खूपच शानदार होता.या एपिसोड दरम्यान अशनूर कौर आणि अभिषेक बजाज भावनिक संवाद पाहायला मिळाले. त्यामुळे अशनुर कौर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 

'बिग बॉस १९'मध्ये दिसणारी अशनुर कौरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच तिने अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. सध्या बिग बॉसच्या घरात अशनुरने केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. विकेंड का वार मध्ये तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनुरचं वय आणि तिच्या शरीरयष्टीची खिल्ली उडवली. त्यादरम्यान, अभिषेकसोबत बोलताना, अशनुरने तिला अनेकदा शरीरयष्टीवरून बोललं गेलं आहे, असं सांगितलं. त्यामुळे तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 

किशोयवयात अशनुरला एका गोष्टीचं प्रचंड टेन्शन यायंचं असंही तिने म्हटलं. नेमकं त्यावेळी तिला कोणत्या गोष्टीचं टेन्शन सतावत होतं, याविषयी अशनुरने सांगितलं,"जेव्हा मी बाहेर जाऊन माझे आवडते पदार्थ म्हणजेच जंक फूड वगैरे खाते, तेव्हामला त्याचं फार टेन्शन यायचं. कारण,हे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा माझ्या शरीरावर परिणाम होईल, असं वाटायचं. त्यामुळे मी घरी परत आल्यानंतर जबरदस्तीने उल्टी करायचे आणि दुसऱ्या दिवशी अशीच उपाशी राहायचे."

त्यानंतर  अभिषेक आणि अशनूर तलावाजवळ गप्पा मारण्यात रमून गेले. यावेळी अभिषेकने अशनूरला विचारले की ती कधी प्रेमात पडली आहे का, त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत अशनूर म्हणाली,"नाही, पण ते नक्कीच होईल. "  

English
हिंदी सारांश
Web Title : Actress induced vomiting fearing weight gain, stayed hungry for days.

Web Summary : Ashnoor Kaur, a Bigg Boss 19 contestant, revealed she induced vomiting after eating junk food due to weight gain fears, often starving herself. She shared this during a conversation about body shaming on 'Weekend ka Vaar'.
टॅग्स :अशनूर कौरबिग बॉस १९टिव्ही कलाकार