Bigg Boss 19 Double Eviction On Weekend Ka Vaar : 'बिग बॉस १९'चा हा आठवडा खूप खास ठरला. कारण, सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने 'वीकेंड का वार' होस्ट करू शकला नाही. सलमान खानच्या जागी फराह खान, अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांनी स्पर्धकांची शाळा घेतली. Bigg Boss 19 च्या पहिल्याच आणि दुसऱ्या आठवड्यात एकही स्पर्धक घराबाहेर गेला नव्हता. परंतु, तिसऱ्या आठवड्यात सर्वांनाच धक्का मिळाला आहे. कारण, Bigg Boss 19 च्या घरातून एक नव्हे तर दोन स्पर्धक बेघर झाले. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Bigg Boss 19 च्या तिसऱ्या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी आवेज दरबार, नगमा मिराजकर, नतालिया आणि मृदुल तिवारी हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. रविवारी सर्वात आधी नतालिया घरातून बाहेर झाली. त्यानंतर होस्ट फराह खानने 'डबल एविक्शन'चं सरप्राईज दिलं आणि नगमा मिराजकर हिलाही घरचा रस्ता दाखवण्यात आला.
फराह खानने नगमाच्या एविक्शनचे कारण स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "तुला किती वेळा सांगितलं होतं की सक्रीय हो. बाहेर तुझे किती फॅन्स आहेत, याने काही फरक पडत नाही. जर तू घरात सक्रीय राहिली नाहीस, तर तुला मते मिळणार नाहीत".
नगमाच्या एविक्शनवर तिचा मित्र आवेज दरबार म्हणाला, "ही खूप स्ट्रॉन्ग आहे, मी याच्याकडून खूप काही शिकलो. दोन आठवड्यांपासून आजारी असल्यामुळे ती सक्रीय राहू शकली नाही". निरोप घेताना नगमानं आवेजला आणखी चांगलं खेळण्याचा सल्ला दिला. ती आवेजला म्हणाली, "माझ्याशिवाय खूप चांगलं परफॉर्म कर. मी बाहेर लग्नाची तयारी करून ठेवते". नतालिया बेघर झाल्यावर मृदुल तिवारीही दुःखी झाला होता. दरम्यान, आता दोन स्पर्धकांच्या अचानक जाण्याने घरातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत आणि पुढील आठवड्यात काय घडणार याची उत्सुकता आता वाढली आहे.