Join us

"त्याच्याशी लग्न करणे हा चुकीचा निर्णय..." घटस्फोटावर बोलताना नीलम गिरी झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 11:54 IST

'बिग बॉस'च्या घरात तान्या मित्तलशी बोलताना निलमनं पहिल्यांदाच घटस्फोटाचा कटू अनुभव शेअर केला.

Neelam Giri Opens Up on Painful Divorce : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस १९'चं  (Bigg Boss 19) यंदाचं पर्व गाजतंय. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा आतापर्यंत एक वेगवेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरातील खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळंही चर्चेत आहेत. या सीझनमधील स्पर्धक भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी आता एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे.  'बिग बॉस'च्या घरात तान्या मित्तलशी बोलताना निलमनं पहिल्यांदाच घटस्फोटाचा कटू अनुभव शेअर केला.

तान्या मित्तलशी बोलताना लग्नाच्या विषयावर नीलम भावनिक झाली आणि तिच्या वैवाहिक जीवनातील कटू आठवणी ताज्या झाल्या.mनीलम म्हणाली, "त्या नात्यात कधीही आनंदाचा एकही क्षण आला नाही". तिने स्पष्ट केले की वेगळे होण्याचा निर्णय दोघांनी परस्पर सहमतीने घेतला असला तरी तो भावनिकदृष्ट्या तिच्यासाठी खूप दुःखद होता. नीलम म्हणाली, "त्याच्याशी लग्न करणे हा एक चुकीचा निर्णय होता. त्याबद्दल विचार करूनही मला दुःख होते".

नीलम गिरी हिला भोजपुरी चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' म्हटलं जातं. तिच्या डान्स करण्याच्या स्टाईलमुळे तिच्या स्टेप्समुळे तिची माधुरीशी तुलना केली जाते. नीलम गिरी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी, ही टिकटॉकवर व्हिडीओ बनवायची. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी तिला हेरलं आणि तिला 'धनिया हमार' या म्युझिक व्हिडीओमध्ये भूमिका करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तिनं २०२१ मध्ये 'बाबुल' या म्युझिक व्हिडीओमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि लवकरच ती भोजपुरी चित्रपटसृष्टीतली टॉप अभिनेत्री बनली. आता 'बिग बॉस'च्या घरातील तिचा प्रवास ट्रॉफी उचलण्यापर्यंत पोहचतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Neelam Giri gets emotional discussing her divorce; calls it a mistake

Web Summary : Bhojpuri actress Neelam Giri, a Bigg Boss 19 contestant, shared her painful divorce experience with Tanya Mittal. She revealed that marrying him was a mistake, as the marriage lacked happiness. Though the decision to separate was mutual, it was emotionally difficult for her.
टॅग्स :बिग बॉस १९सेलिब्रिटीघटस्फोट