Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मध्ये गेल्या आठवड्यात दोन सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागला. बसीर अली आणि नेहाल चुडासमा या दोघांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घरात बसीरने सुरुवातीला प्रणित मोरेला टार्गेट केलं होतं. "तू तुझ्या गावी जा", असं तो प्रणितला म्हणाला होता. एवढंच नव्हे तर बसीरने प्रणितला घरातून बाहेर काढण्याचं चॅलेंजही दिलं होतं. "आधी घराबाहेर कोण जातंय" अशी पैज दोघांमध्ये लागली होती.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रणितसोबत लावलेल्या या पैजेबाबत बसीरने भाष्य केलं. तो म्हणाला, "वाईट वाटण्यापेक्षा मी म्हणेन आमच्यात पैज लागली होती. मी नॅशनल टीव्हीवर त्याच्यासोबत पैज लावली होती. त्यामुळे मी हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा मी सगळ्यांना बाय म्हणत होतो. तेव्हा प्रणित माझ्या समोर उभा होता. त्याला मी बाय म्हटलं तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो इमोशनल झाला होता. मी त्याला म्हटलं की तू तर पैज जिंकला. मग त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला गप्प बस".
"मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्याचा बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतर तो घरातून बाहेर येईल. त्यानंतर आम्ही याबद्दल नक्कीच बोलू. जे मी बिग बॉसच्या घरात बोललो होतो. तर पैजेबाबत नक्कीच तुम्हाला काहीतरी पाहायला मिळेल", असं बसीर म्हणाला. प्रणित आणि बसीरमध्ये बिग बॉसच्या घरात मोठा वाद झाला होता. ज्यामुळे बसीरला ट्रोलही केलं गेलं होतं.
Web Summary : Basheer Ali, evicted from Bigg Boss, acknowledged losing a bet to Praneet More. Despite initial challenges, Basheer revealed a heartfelt moment with Praneet and hinted at future interactions post-show, promising viewers something related to the bet.
Web Summary : बिग बॉस से बाहर हुए बशीर अली ने प्रणीत मोरे से शर्त हारने की बात स्वीकार की। शुरुआती चुनौतियों के बावजूद, बशीर ने प्रणीत के साथ एक हार्दिक पल का खुलासा किया और शो के बाद भविष्य में बातचीत का संकेत दिया, दर्शकों से शर्त से संबंधित कुछ देखने का वादा किया।