Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं १८वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या पर्वात मॉडेल किम कार्दशियन वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बॉडीगार्डलाही बिग बॉसची ऑफर असल्याचं समोर आलं आहे. मोदींचा ex बॉडीगार्ड लकी याला बिग बॉस १८साठी विचारणा झाली होती. मात्र त्याने ही ऑफर धुडकावून लावली आहे.
लकी एक पूर्व स्नायपर आणि रॉ एजेंट आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड फेमस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लकीला बिग बॉसची ऑफर होती. मात्र त्याने या शोसाठी स्पष्ट नकार दिला. "एक रॉ एजेंट असल्याने आमचं आयुष्य हे अत्यंत गोपनीय असतं. फार कमी लोकांना आमच्या आयुष्याबद्दल माहीत असतं. आमचं नैयक्तिक आयुष्य आणि ओळख लपवण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आणि मी याचं पालन करतो. मी हे स्वीकारलं आहे. लोक मला समजून घेत आहेत आणि समर्थन देत आहेत याचा आनंद आहे", असं लकीने सांगितलं आहे.
लकी हा मुळचा उत्तराखंडचा आहे. बिग बॉसच्या टीमशी बोलल्यानंतर लकीने हा शो न करण्याचा निर्णय घेतला. 'हिटमॅन: द रियल स्टोरी ऑफ एजंट लीमा'मध्ये लकीची शौर्यगाथा दाखविण्यात आली होती. लवकरच त्याच्यावर सिनेमादेखील येणार आहे.