Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 17:25 IST

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. 

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले होते. सदावर्तेंनी त्यांच्या स्टाइलने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करण्यास सुरुवात केली होती. पण, आठवड्याभरानंतरच सदावर्तेंना बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंनी टाइम ऑफ इंडियाला मुलाखत दिली. ते म्हणाले, "मी रील स्टार नाही तर रिअल स्टार आहे. या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. मला कलाकारांबद्दल आदर आहे. बिग बॉसच्या घरातही खूप टॅलेंटेड कलाकार आहेत. मी सिनेइंटस्ट्रीतला नाही. तरीदेखील माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे लोकांचं प्रेम मला मिळत आहे. माझे विचार आणि ज्यापद्धतीने मी बोलतो त्यामुळे लोकांना मी आवडत आहे. ये पब्लिक है ये सब जानती है". 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचं कारण सांगत सदावर्ते म्हणाले, "कानून के हाथ बडे लंबे होते है... मला शो सोडावा लागला कारण मला कोर्टाची नोटीस मिळाली होती. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलेलं नाही. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेमुळे मला शो सोडावा लागला. २०१४ पासून माझी पत्नी जयश्री पाटील याचा लढा देत आहे. ही खूप महत्त्वाची केस होती आणि माझं तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं". 

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्तेटिव्ही कलाकार