Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:41 IST

एका मराठमोळ्या अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं समजत आहे. 

Bigg Boss : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी बिग बॉसनंतर लगेचच बिग बॉस हिंदीचा नवा सीझन सुरू होणार आहे. बिग बॉस हिंदी १८ या सीझनसाठी सेलिब्रिटींना विचारणा होत आहे. आतापर्यंत अर्जुन बिजलानी, कशीश कपूर, दिग्विजय सिंह राठी यांना बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झाल्याचं समोर आलं होतं. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं समजत आहे. 

'आई कुठे काय करते' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिला हिंदी बिग बॉससाठी विचारणा झाली आहे. 'बिग बॉस हिंदी १८' मध्ये सहभागी होण्यासाठी रुपालीला ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  यामुळे रुपाली हिंदी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी रुपाली बिग बॉस मराठी २मध्ये दिसली होती. बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या रुपालीला आता हिंदी बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, अद्याप याबाबत रुपालीने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

सध्या रुपाली आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. रुपालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असून तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाबिग बॉसरुपाली भोसलेटिव्ही कलाकार