Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फिक्स्ड आहे 'बिग बॉस 17' चा विजेता...', घराबाहेर पडताच अनुराग डोभालकडून पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 17:38 IST

नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुरागने 'बिग बॉस 17' ची पोलखोल केली.

मनोरंजन जगतातील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस 17'. आता 'बिग बॉसच्या 17' वा सिझन फायनलकडे वळत आहेत. त्यामुळे जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता आणि घरात वेगवेगळे ट्विस्ट होत आहेत.  नुकतेच अनुराग डोवालचा 'बिग बॉस 17' चा प्रवास संपला आहे. घराबाहेर पडताच अनुराग  डोवालकडून बिग बॉसवर पक्षपाताचा आरोप करण्यात आला आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुरागने 'बिग बॉस 17' ची पोलखोल केली.

अनुरागला प्रेक्षकांच्या मतांवर नव्हे तर घरातील सदस्यांच्या परस्पर संमतीने घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 'बिग बॉस 17' मधून बाहेर आल्यानंतर अनुराग डोवालने डीएनएला मुलाखत दिली. यावेळी त्याने निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप केले. तो म्हणाला, 'लोकांच्या मतानुसार विजेत्याची निवड केली जाणार नाही. माझ्या एलिमिनेशननंतर हे सिद्ध झाले आहे की, बिग बॉस आता प्रेक्षकांच्या मतांवर आधारित नाही. निर्माते त्यांच्या आवडीपैकी एकाला त्यांचा विजेता निवडतील. त्यांचा विजेता निश्चित आहे'. 

पुढे तो म्हणाला, 'मागील 16 सीझनचे सर्व काही निष्पक्ष होते, पक्षपात नव्हता.  मला नुकतेच कळले की माझे लाईव्ह स्ट्रीम म्यूट केले गेले होते. संपूर्ण सीझनमध्ये माझे पालक शोमध्ये आले नाहीत, असे अनेकांनी म्हटलं. पण, माझ्या वडिलांना दोनदा ब्रेन स्ट्रोक आला होता. ही गोष्ट मी शोमध्ये कधीही शेअर केली नाही'. 

सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ओरी,  ईशा मालवीय, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनयु ट्यूब