Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जळतोस तु माझ्यावर...', अंकिता कॅप्टन होताच विकीसोबत झालं जोरदार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:41 IST

'बिग बॉस १७' वा सिझन फायनलकडे वळत आहेत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' ला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. दिवसेंदिवस हा शो खूपच रंगतदार होत चालला आहे. घरातील सर्वच कंटेस्टंट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहेत. अशामध्ये घरातील सदस्य अंकिता लोखंडे आणि तिचा विकी जैन यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. 

'बिग बॉस १७' चा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिता लोखंडे घराची कॅप्टन बनल्यानंतर विकीसोबत जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे.  अंकिता लोखंडेने कॅप्टन होताच तिने घरातील काम घरातील सदस्यांमध्ये वाटून दिली. यावेळी विकीने टोकताच अंकिताने कॅप्टनचा आदर करा, असे म्हटलं. यावर विकीने उत्तर दिले की, 'कॅप्टनचा आदर त्याच्या वागण्यावर अवलंबून असेल'.  

यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो. तसेच 'तुला फक्त तोंड चालवायला येते. आली मोठी कॅप्टन', असेही विकी म्हणतो. यावर  रागाच्या भरात 'तू काय करतोस, तुला काय माहिती आहे.  नेहमी जळत राहतोस माझ्यावर', असे अंकिता विकीला म्हटल्याचे व्हिडीओत दिसते. अंकिता लोखंडे ही 'बिग बॉस १७' मधील एक मजबूत स्पर्धक आहे. यासोबतच तिची फॅन फॉलोइंगही जोरदार आहे. 

'बिग बॉस १७' वा सिझन फायनलकडे वळत आहेत. त्यामुळे जसजसा फिनाले जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता आणि घरात वेगवेगळे ट्विस्ट होत आहेत. सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान, ओरी,  ईशा मालवीय, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, समर्थ जुरेल हे स्पर्धक आहेत. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेटेलिव्हिजनबिग बॉससेलिब्रिटी