Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ऑरीने एका दिवसातच सोडला 'बिग बॉस' शो, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:14 IST

Bigg Boss 17 : एका दिवसातच 'बिग बॉस'च्या घरातून ऑरीची एक्झिट, नेमकं कारण काय?

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. यंदाचं 'बिग बॉस'चं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस १७' मध्ये अनेक सेलिब्रिटी चेहरे दिसून आले. तर काही दिवसांपूर्वीच सेलिब्रिटींचा फेव्हरेट असलेल्या ऑरीने बिग बॉस १७च्या घरात एन्ट्री घेतली. पण, एका दिवसातच ऑरीने 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतली आहे. 

'बिग बॉस'च्या घरात शनिवारी(२५ नोव्हेंबर) ओरहान अवात्रामणि म्हणजेच ऑरीने एन्ट्री घेतली होती. ऑरीसाठी 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी शानदार पार्टीचं आयोजनही केलं होतं. पहिल्याच दिवशी ऑरीने त्याच्या मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावाने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची मनं जिंकली होती. पण, रविवारी त्याने घरातून एक्झिट घेतली. एका दिवसातच ऑरीने 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतल्याने घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

 

यंदाच्या 'बिग बॉस'मध्ये दर रविवारप्रमाणे यंदाही जस्ट चिल विथ सोहेल अँड अरबाज सेशन झालं. सोहेल आणि अरबाजने घरातील सदस्यांची फिरकी घेत त्यांचं मनोरंजन केलं. पण, शेवटी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाताना ते ऑरीलाही घेऊन गेले. ऑरी फक्त एक दिवसासाठी 'बिग बॉस'च्या घरात आला होता, असं त्यांनी घरातल्या सदस्यांना सांगितलं. 

दरम्यान, ऑरी हा अनेक सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड आहे. सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये तो अनेकदा दिसून येतो. उद्योगपती अंबानींच्या पार्टीतही ऑरी दिसला होता. अनेक सेलिब्रिटींबरोबरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार