Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडे हिला मोठा धक्का, विकी जैनचा प्रवास संपला? हैराण करणारा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 10:02 IST

नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कायम चर्चेत असतो.  आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरातील स्पर्धेकांनी प्रेक्षकांचे आतापर्यंत जबरदस्त मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर फिनाले विकमध्येही घरामध्ये मोठे वाद बघायला मिळाले. आता नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या हंगामातील अंतिम एलिमिनेशन पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये सध्या एकूण ६ सदस्य शिल्लक आहेत. त्यात अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, विकी जैन, मुनव्वर, अभिषेक कुमार आणि अरुण यांचा समावेश आहे. आता उर्वरित सदस्यांपैकी एक जण बाहेर पडणार आहे. तो स्पर्धक हा विकी जैन असल्याचं बोललं जात आहे. 'द खबरी'नुसार,  शोमधून बाहेर पडणारा सदस्य अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आहे.

 बिग बॉसच्या या निर्णयानंतर अंकितासह चाहतेही हैराण झाले आहेत. चाहत्यांच्या मते तो  तो खूप चांगला खेळत होता. काही चाहत्यांनी अरुण घराबाहेर पडले, असा अंदाज बांधला होता.  विकीच्या एलिमिनेशननंतर विविध चर्चा रंगल्या आहेत.आता अंकिता, अभिषेक, मुनव्वर, मन्नारा आणि अरुण हे ५ टॉपवर आहेत. अद्याप कलर्सकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता येत्या एपिसोडमध्ये कोण घराबाहेर पडणार हे कळेलचं. 

 'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. आता काहीच दिवसात या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेची ग्रँड पार्टी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीझनच्या विजेत्याला सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. तसेच एक आलिशान कारही मिळणार आहे.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनअंकिता लोखंडेटिव्ही कलाकार