Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : "सुशांतच्या चाहत्यांकडून सहानुभुती मिळवून...", रुपाली भोसलने अंकिता लोखंडेला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 10:27 IST

'बिग बॉस १७'बद्दल रुपालीने मांडलं स्पष्ट मत, अंकिता लोखंडेलाही सुनावलं

'बिग बॉस १७' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. अंकिता तिच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. पण, अंकिताच्या घरातील वागण्यावरुन नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. 'बिग बॉस'च्या घरात सतत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतल्यामुळे चाहत्यांनी तिला ट्रोलही केलं होतं. आता मराठी अभिनेत्री आणि 'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक रुपाली भोसलेने अंकिताला सुनावलं आहे.

रुपालीने 'बिग बॉस १७'बद्दलचं तिचं मत मांडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने "अंकिता पहिल्या दिवसापासून तू मी स्ट्राँग, स्वतंत्र आहे, असं म्हणत आहेस. तू प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनच्या अगोदर किंवा नंतर सुशांत सिंह राजपूतचं नाव का घेतेस? हा खेळ का खेळतेस? सुशांतच्या चाहत्यांकडून सहानभूती मिळवून वोट मिळवण्यासाठी करतेस का? जर तू म्हणतेस तशी तू आहेस, तर स्वत:ला सिद्ध कर. वोट मिळवण्यासाठी भूतकाळातील गोष्टींची गरज नाही," असं म्हटलं आहे.

पुढे रुपाली म्हणते, "जेव्हा वीकेंड का वारमध्ये सलमानने मुन्नवरला सांगितलं होतं की तू नेहमी माझ्याबरोबर काय झालं हे सांगून काय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस? ती गोष्ट घडून गेली आहे. आता रिएलिटी शोमध्ये इथे या गोष्टी करू नकोस...तेव्हा तू खूपच उपहासात्मक हावभाव दिले होतेस. म्हणजे स्वत:ला केलं तर बिचारी आणि दुसऱ्यांनी केलं तर विक्टिम कार्डचा टॅग..." 

रुपालीची ही पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुपालीने त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. सध्या रुपाली 'आई कुठे काय करते'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

टॅग्स :बिग बॉसरुपाली भोसलेटिव्ही कलाकार