Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात मनारा चोप्राची रडून रडून झाली 'अशी' अवस्था, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:26 IST

मनारा चोप्राला सोडायचं आहे 'बिग बॉस'चं घर, रडून रडून झाली 'अशी' अवस्था, व्हिडिओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असलेला रिएलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेलं 'बिग बॉस'चं नवं पर्वही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे. 'बिग बॉस १७'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मनारा चोप्राही सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मनारा 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. मनारा तिच्या स्वभावाने घरातील सदस्यांची मनं जिंकून घेत प्रेक्षकांचंही मनोरंजन करत आहे.

पण, मनाराला आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडायचं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील मनाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती रडताना दिसत आहे. रडून रडून मनाराची वाईट अवस्था झाल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. "बिग बॉस मला कन्फेशन रुममध्ये बोलवा. मला हा शो सोडायचा आहे," असं मनारा व्हिडिओत म्हणत आहे. आतापर्यंत उत्तम खेळी करणाऱ्या मनाराला अचानक 'बिग बॉस'चं घर का सोडायचं आहे, याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. 'बिग बॉस'च्या येणाऱ्या भागातच याचा उलगडा होईल. 

दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरात मनाराने पहिल्या दिवसापासूनच सदस्यांबरोबर मैत्री करायला सुरुवात केली होती. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, सना खान यांच्याबरोबर मनाराची चांगली मैत्री झाली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या टास्कदरम्यान अंकिता आणि मनारामध्ये वाद झाल्याचं दिसून आलं होतं.  

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार