Join us

Bigg Boss 17 Finale: मन्नारा चोप्राचा प्रवास संपला, टॉप 2 सदस्य समोर; उत्सुकता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 00:23 IST

मुनव्वर फारुकी की अभिषेक कुमार कोण जिंकणार?

Bigg Boss 17 Finale:  बिग बॉस 17 फिनालेची चुरस हळहळू वाढत आहे. काहीच क्षणात बिग बॉसचा विजेता घोषित होणार आहे. टॉप 3 स्पर्धकांमधून  मन्नारा चोप्रा (Mannara Chopra)  बाहेर पडली आहे. तर आता मुनव्वर आणि अभिषेक कुमार यांच्यात चुरस आहे. या दोघांमध्ये ट्रॉफीसाठी शर्यत आहे. कमी वोट्स मिळाल्याने मन्नारा चोप्रा टॉप 3 मधून बाहेर पडली आहे. ज्याला जास्त वोट्स मिळाले तो स्पर्धक यंदाच्या बिग बॉसच्या सिझनचा विजेता ठरणार आहे. 

मन्रारा चोप्राने तिच्या अप्रतिम खेळीतून टॉप 3 पर्यंत मजल मारली. मात्र वोट्सच्या आधारे तिला बाहेर पडावे लागले. तरी तिच्या चाहत्यांना तिचा अभिमान आहे. नेहमी 'बबली मूड' मध्ये असलेली मन्नारा एविक्ट झाल्यावरही एकदम कूल मूडमध्ये दिसली. जवळपास तीन महिने चाललेल्या बिग बॉस सिझन 17 चा आज शेवट होत आहे. टॉप 2 सदस्य बिग बॉसला मिळाले आहेत. मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्यातील एक जण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार आहे. चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान सोशल मीडियावर मुनव्वरची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आता काही क्षणात सलमान खान एकाचा हात धरुन त्याला बिग बॉस चा विजेता घोषित करणार आहे. या क्षणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

बिग बॉस 17 चा जो विजेता ठरणार त्याला 50 लाख रुपये मिळणार आहेत. शिवाय एक आलिशान कारही मिळणार आहे. याआधी बिग बॉसची ही रक्कम 1 कोटी रुपये होती. मात्र नंतर यामध्ये घट करण्यात आली. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनसलमान खान