बिग बॉस १७ मध्ये झळकलेला प्रसिद्ध युट्यूबर अरुण श्रीकांत महाशेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरुण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरुण सतत त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. यावेळी अरुण मात्र या गुडन्यूजमुळे चर्चेत आला आहे. अरुण दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. अरुणची पत्नी मलक पुन्हा एकदा गरोदर झाली आहे. अरुण आणि मलक त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.
अरुण दुसऱ्यांदा होणार बाबा
अरुण आणि मलक यांनी सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलकच्या हातात प्रेग्नंसी किट दिसते. अरुण जेव्हा पत्नीच्या हातात ही किट बघतो तेव्हा त्यांच्या आनंदाला उधाण येतं. अरुणच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो की, या बातमीमुळे ते दोघं किती खुश आहेत. हा व्हिडीओ बघताच अरुणच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याचं अभिनंदन केलं आहे.
अरुण आणि मलकला आहे पहिली मुलगी
अरुण आणि मलक या दोघांना याआधी मुलगी झाली होती. या मुलीचं नाव आहे जूरी. अरुण जेव्हा 'बिग बॉस १७'मध्ये सहभाग होता तेव्हा फॅमिली वीकमध्ये अरुणची पत्नी त्यांच्या मुलीला घेऊन आली होती. आता हे दोघे दुसऱ्यांदा आई - बाबा बनणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. अरुणने बिग बॉसचा १७ वा सीझन चांगलाच गाजवला. उत्कृष्ट खेळामुळे अरुणने बिग बॉसच्या फिनालेपर्यंत मजल मारली होती. अरुण आणि मलक यांनी २०२१ मध्ये एकमेकांशी लग्न केलं.