Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे चुकीचं आहे! मुनव्वर फारुकी 'बिग बॉस १७'चा विजेता ठरल्याने अंकिताची जाऊबाई भडकली, म्हणाली - तिने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:46 IST

'बिग बॉस १७'च्या फायनलनंतर खूश नाही विकी जैनची वहिनी, म्हणते- अंंकिताने...

'बिग बॉस १७'चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अभिषेक कुमार फर्स्ट रनर अप ठरला. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने 'बिग बॉस'च्या टॉप ५मध्ये स्थान मिळवलं होतं. अंकिता 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीचीही प्रबळ दावेदार मानली गेली होती. पण, तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.  त्यामुळे चाहेतही नाराज होते. 

'बिग बॉस'च्या फायनलनंतर अंकिताही नाराज असल्याचं दिसून आलं. तर आता अंकिताच्या जाऊबाईने याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'बिग बॉस १७'च्या फायनलच्या निर्णयावर विकी जैनची वहिनी खुश नसल्याचं दिसत आहे. मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे. 'विरल भय्यानी' या इन्स्टाग्राम पेजवरुन अंकिताच्या जाऊबाईंचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अंकिताची सासू आणि तिची जाऊबाई एकाच गाडीतून जात असल्याचं दिसत आहे. 

विकीची वहिनी म्हणते की, "हे खूप चुकीचं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर अंकिता असायला हवी होती. मला वाटलेलं की पहिली किंवा दुसरी अंकिताच येईल." या व्हिडिओवर अंकिताच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. दरम्यान, 'बिग बॉस १७'च्या टॉप ५मध्ये अंकिताबरोबर मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण शेट्टी यांनी जागा मिळवली होती. अरुण शेट्टीला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर मन्नारा दुसरी रनर अप ठरली. 

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडेटिव्ही कलाकार