Join us

'बिग बॉस 17'च्या घरात पुन्हा रडली अंकिता, पती विकी जैनसोबत झालं कडाक्याचे भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:59 IST

'बिग बॉस सीझन 17' शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळत आहे. 

'बिग बॉस सीझन 17'  हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय झाला आहे.  शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहे.  रिअल लाईफ कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन देखील सहभागी झाले आहेत. ही जोडी शोमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळवत आहे. पण, दोघांमध्ये भांडण पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता विकीशी बोलताना दिसतेय. ती प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. दोघांचे भांडण हे जेवण बनवण्यावरून होते.  प्रोमोमध्ये दिसते की, अंकिता जेवण बनवत आहे. यावेळी विकी खानझादीच्या स्वयंपाकाच्या कौतुक करतो. तेव्हा अंकिता म्हणते, 'मी तुझ्यासाठी बनवते. पण तुला खानजादीने बनवलेलं खायचं आहे'. तर यावर विक्की म्हणतो, 'तीन वर्षात तू असं बनवलंस तरी काय?'. अंकिता म्हणते, 'मी प्रेमाने बनवत होते'. त्यावर विक्की तिला 'याची काही गरज नाही. प्रेम मिसिंग आहे'. माझ्याशी बोलू नको, असे म्हणतो. यानंतर अंकिता रडताना दिसतेय.

नंतर अनेक नेटकऱ्यांनी विकीला ट्रोल केले. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं,  'मी अंकिताचा फॅन नाही... पण मला वाटते की विकी हा तिच्या लायक नाही. भांडण झाल्यावरही तिने तुझी बाजू घेतली.कारण ती तुझ्यावर प्रेम करते'. तर दुसऱ्या युजरने लिहले, 'विकी नेहमी सर्वांसमोर अंकिताचा अपमान करतो, हे अत्यंत चुकीचे आहे'.

अंकिता टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये मालिकांसोबतच काही चित्रपटामध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील अंकिता ही सर्वात महागडी स्पर्धक असल्याचं म्हटलं जात आहे. विकी आणि अंकितासोबतच या सीझनमध्ये ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, स्टॅंडप कॉमेडियन मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, खानजादी, अभिषेक कुमार, ईशा मालवीय हे बिग बॉसच्या घरात आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडेबॉलिवूडसेलिब्रिटीबिग बॉस