Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोल्ड डिगर आहे अंकिता लोंखडे! अभिषेक कुमारच्या कमेंटवर संतापले चाहते, बिग बॉस दाखवणार बाहेरचा रस्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 12:03 IST

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिषेक कुमारने अंकिताला गोल्ड डिगर म्हटल्यानंतर तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ कायमच चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मीडियावरही ‘बिग बॉस मराठी १७’ चा गाजावाजा पहायला मिळतोय. दिवसेंदिवस शो अधिक रंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अभिषेक कुमारने अंकिताला गोल्ड डिगर म्हटल्यानंतर तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. 

 नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अभिषेक आणि विक्की यांच्यात जोरदार भांडण झाले. यानंतर अभिषेकने विकीची पत्नी अंकितावरही राग काढला. अंकिताने केवळ पैशासाठी विकीशी लग्न केले, असे तो म्हणाला. आपल्या आवडत्या अभिनेत्रीसाठी असे घाणेरडे शब्द ऐकून चाहते अभिषेक कुमारवर संतापले आहेत.  अंकिताच्या समर्थनार्थ अनेक चाहत्यांनी आपले मत व्यक्त केले. अंकित टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर अभिषेक तिच्या बाजूलाही उभा राहू शकणार नाही, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

बिग बॉसच्या घरात सहभागी झालेली अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी तर प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू झाली आहे. शिवाय, मुनव्वर फारुकीही गर्लफ्रेंडच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  त्यामुळे शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. आजच्या भागात काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडेटेलिव्हिजनसेलिब्रिटी