Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 16: सोशल मीडियावर चाहत्यांची खास मागणी, म्हणाले- ‘यावेळी प्लिज...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 21:20 IST

हिंदी बिग बॉसचे स्पर्धक १ ऑक्टोबरला समजणार

Bigg Boss 16 Salman Khan: बिग बॉसचे चाहते नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला प्रोमो समोर येताच बिग बॉस 16 च्या प्रीमियर एपिसोडची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून हा सीझन सुरू होत आहे. सध्या स्पर्धकांच्या संदर्भात अनेक नावे समोर आली आहेत, मात्र त्या नावांची निश्चिती १ ऑक्टोबरलाच होणार आहे. दरम्यान, या शो च्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी यावेळी निर्मात्यांना एक खास विनंती केली आहे. ही मागणी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या संदर्भातील नसून काही औरच आहे. काय आहे ती मागणी जाणून घ्या...

बिग बॉसच्या चाहत्यांचे मत आहे की यावेळी प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटींना या कार्यक्रमात घ्यावे. शो चा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर, जवळजवळ प्रत्येक जण कमेंट करत एक मागणी करताना दिसत आहे. सिद्धार्थ शुक्ला, हिना खान, गौहर खान, रुबिना दैलिक, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या शो मध्ये घ्यावे, असे चाहत्यांकडून मागणी केली जात आहे. कारण त्याच स्टार्समुळे शो मध्ये रंगत येते असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

राज कुंद्रा स्पर्धकांच्या यादीत, दोन अटीही ठेवल्याची चर्चा

बिग बॉस शो चे प्रत्येक पर्व नेहमीच चर्चेत राहिले आहे. शो मधील स्पर्धकांमधील विविध गोष्टी पाहायला चांगलीच मजा येते. संभाव्य स्पर्धकांमध्ये राज कुंद्राचे नावही समोर येत आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. शो मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने २ अटी ठेवल्याचे बोलले जात आहे. पहिली अट म्हणजे त्याला शो मध्ये जास्त काळ राहायचे आहे आणि दुसरी म्हणजे संपूर्ण सीझनसाठी त्याचे मानधन हे तब्बल ३० कोटी रुपये असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कुंद्राने बिग बॉस 16 साठी ३० कोटी रुपये घेतले आहेत. त्या पैशाचा वापर तो चॅरिटीसाठी करणार आहे. या बातम्यांमध्ये नक्की किती तथ्य आहे, हे तर १ ऑक्टोबरलाच कळेल. याशिवाय शिवांगी जोशी, करण पटेल, मुनव्वर फारुकी, टीना दत्ता यांसारख्या सेलिब्रिटींनाही या शोमध्ये भाग घेतल्याचे बोलले जात आहे. आता १ तारखेलाच या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खानसोशल मीडिया