Join us

"क्या गरीब बनेगी रे तू?", भिकाऱ्याच्या वेशातील अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 15:52 IST

एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री भिकाऱ्याच्या वेशात दिसत आहे. भिकाऱ्याच्या वेशातील या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे.

अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री भिकाऱ्याच्या वेशात दिसत आहे. भिकाऱ्याच्या वेशातील या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस फेम प्रियांका चहर चौधरी आहे. एका शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल केलं आहे. 

प्रियांकाचा हा व्हिडिओ 'इन्स्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. पण, भिकारीच्या वेशातील प्रियांकाला नेटकऱ्यांनी एका गोष्टीवरुन ट्रोल केलं आहे. या व्हिडिओत प्रियांकाचे केस विस्कटलेले दिसत असून तिचे कपडेही मळलेले दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ती बसलेली दिसत आहे. एक छोटा मुलगा प्रियांकाजवळ येऊन तिला काहीतरी भरवत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या प्रियांकाच्या हातात डायमंड रिंग दिसत आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "डायमंड रिग आहे तर भीक कशाला मागतेस", "डायमंड रिंग घालून काय भिकारी बनणार तू?", "मला तर वाटलं की कोणीतरी खरंच भिकारी आहे ज्याच्या हातात डायमंड रिंग आहे", "भिकाऱ्याचा रोल करतेस तर डायमंड रिंग तरी काढून ठेवयाची होतीस", असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

दरम्यान, प्रियांकाचा हा व्हिडिओ तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दोस्त बनके' या गाण्यातील आहे. प्रियांका बिग बॉस १६मध्ये सहभागी झाली होती. या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस