Join us  

Bigg Boss 15: जंगलात राहणाऱ्या सदस्यांचे झाले हाल, बिग बॉसने या सदस्यांचे हिसकावले सामान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 6:03 PM

बिग बॉस १५ शोमध्ये सुरूवातीपासूनच बरेच ट्विस्ट पहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १५ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुरूवातीपासूनच शोमध्ये बरेच ट्विस्ट पहायला मिळत आहे. या शोचा होस्ट सलमान खानने या सीझनला सुरूवात होण्यापूर्वीच घरातील सदस्यांना चेतावणी दिली होती की, यंदा बिग बॉसच्या घरात राहणे थोडे आव्हानात्मक असणार आहे. जिथे बिग बॉसच्या जंगलातून एन्ट्री घेण्याआधीच सदस्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागल्या. तर आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांना फक्त जंगलातच राहावे लागत नाही तर त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला आहे.

पहिल्यापासून जंगलात राहणाऱ्या सदस्यांना बिग बॉसच्या आलिशान घरात राहण्यासाठी कठीण आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मात्र सर्वांनाच माहित आहे की बिग बॉसच्या घरात दरवेळी नवीन ट्विस्ट पहायला मिळतो. अशात दुसऱ्याच दिवशी आता घरात राहण्यासाठी एकेक गोष्टींसाठी कित्येक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांना बिग बॉसच्या जंगलातून घरात एन्ट्री मिळणार आहे.

दुसऱ्याच दिवशी बिग बॉसने जंगलात राहणाऱ्या सर्व स्पर्धकांचे सामान हिरावून घेतले. खरेतर बिग बॉसने सर्व जंगल वासियांना आदेश दिला की, आपल्या गरजेच्या आणि एक जोडी कपडे सोडून बाकी सगळे सामान बिग बॉसच्या घरात बनलेल्या जंगलातील गुफेत टाकून द्या आणि हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी बिग बॉसच्या आलिशान घरात राहणाऱ्या सदस्यांना दिली. जिथे एकीकडे सर्व घरातले छोट्या छोट्या गोष्टींवर जगताना दिसत आहेत तिथे बिग बॉस ओटीटीचे राहिलेले स्पर्धक प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी आणि निशांत भटला फक्त बिग बॉसने आलिशान घरात राहण्याची संधी दिली. इतकेच नाही तर त्यांना काही अधिकारही दिलेत. सर्व स्पर्धकांच्या गरजेच्या वस्तू सोडून बाकीचे सामान गुफेपर्यंत आणण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे.

बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट जंगलात राहणाऱ्या सदस्यांसाठी संकट बनून आले आहेत. बिग बॉसने फक्त या तिघांना घरात एन्ट्री केल्यानंतर स्पष्ट सांगितले होते की, घरात पहिल्यांदा कॅप्टन या तिघांपैकी एक कुणीतरी बनणार आणि सोबतच या तिघांकडे काही विशेषाधिकारदेखील असणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस