Join us

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिलची केमिस्ट्री पाहून एक्स गर्लफ्रेंड आकांक्षाने दिली ही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 11:34 IST

आकांक्षा पुरी आता बिग बॉस १३चा स्पर्धक पारस छाब्राची गर्लफ्रेंड आहे.

बिग बॉस १३ची सुरूवात सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल यांच्यादरम्यान बॉण्ड पहायला मिळालं, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. तसेच असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत नाही. चाहत्यांमध्ये सिद्धार्थ व शहनाज या जोडीची किती क्रेझ आहे हे तुम्हाला ट्विटरवर दररोज पहायला मिळते. कारण #SidNaaz हा हॅशटॅग ट्रेंड होत असतो. बिग बॉस १३च्या प्रेक्षकांना असं वाटतं की सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल एकमेकांची काळजी घेतात. तर दुसरीकडे पारस छाब्राची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी नुकतेच सिद्धार्थ व शहनाजच्या नात्यावर बोलली आणि म्हणाली की, जर हे दोघं रिएल लाईफमध्ये एकमेकांना डेट करत असते तर मला खूप आनंद झाला असता.

आकांक्षा पुरीने ट्विट करत लिहिले की, मागील काही दिवसात सिद्धार्थ विशाल व मधुरिमा यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी तो खूप क्यूट वाटतो. मागील आठवड्यातील हा खूप छान भाग होता. सिद्धार्थचं हे रूप त्याच्या रागीट अवतारापेक्षा जास्त चांगलं होता.

काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की सिद्धार्थ शुक्ला व आकांक्षा पुरी एकमेकांना डेट करत होते. मात्र ही अफवा असल्याचे आकांक्षाने म्हटलं. ती म्हणाली की, मी कधी सिद्धार्थला डेट केले नव्हते. आम्ही चांगले मित्र होतो.

 

टॅग्स :बिग बॉसपारस छाब्रा