Join us  

भाईजानवर आली Bigg Bossच्या घरातील किचन-टॉयलेट स्वच्छ करण्याची वेळ; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 11:32 AM

खुद्द सलमान खान आपली ‘घाण’ साफ करतोय म्हटल्यावर घरातल्या सदस्यांची काय अवस्था झाली असेल, हे तुम्ही समजू शकताच.

ठळक मुद्दे   कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल अकाउंटवर यासंदर्भातला प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

बिग बॉस 13’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या जाम चर्चेत आहे. पण आज रविवारी प्रसारित होणारा वीकेंडचा वार कधी नव्हे इतका चर्चेत राहणार आहे. कारणही खास आहे. खुद्द सलमान खानबिग बॉसच्या घरातील टॉयलेट, किचन साफ करताना दिसणार आहे.शनिवारच्या एपिसोडमध्ये घराच्या स्वच्छतेवरून घरातील सदस्य एकमेकांशी भांडताना दिसले. या भांडणात एक झाले बिग बॉसचे घर कधी नव्हे इतके अस्वच्छ दिसले. घरातील सदस्यांना यामुळे काहीही फरक पडला नाही. फरक पडला तो सलमानला. मग काय, सलमान खुद्द बिग बॉसच्या घराची स्वच्छता करण्यासाठी पोहोचला. आता खुद्द सलमान खान आपली ‘घाण’ साफ करतोय म्हटल्यावर घरातल्या सदस्यांची काय अवस्था झाली असेल, हे तुम्ही समजू शकताच.   कलर्स टीव्हीच्या ऑफिशिअल अकाउंटवर यासंदर्भातला प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात सलमान घर साफ करताना दिसत आहे. सलमान खान अचानक बिग बॉसच्या घरात येतो आणि घरातील वॉशरुम, टॉयलेट, किचन, बेडरुम आणि लिव्हिंग एरिया साफ करताना दिसतो. अगदी बाथरूममधील केसांचे पुंजके सलमान स्वत:च्या हातांनी उचलून डस्टबिनमध्ये टाकतो. उष्टी भांडी घासतो. सलमानला असे घर स्वच्छ  करताना पाहून घरातल्या सदस्यांना स्वत:च्या वागण्याची लाज वाटू लागते.

सर्वजण सलमानची माफी मागताना दिसतात मात्र तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. स्वत: घराची स्वच्छता केल्यानंतर सलमान होस्ट करण्यासाठी मंचावर येतो. स्क्रिनवर सलमानला पाहून आसिम त्याला सॉरी सर म्हणतो. यावर ‘किस बात के लिए सॉरी. यहां पर किसी को भी शर्म नहीं है. सब अपने को तीस मार खां समझते है,’ असे सलमान रागारागात म्हणतो.  सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉस हाऊसमधील एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात पारस छाब्रा आणि अरहान खान तसेच घरातले इतर सदस्य घरातील ड्यूटीज वरुन एकमेकांशी वाद घालत असल्याचे दिसले होते.  

टॅग्स :बिग बॉससलमान खान