Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13 : मेरा सैयां साइको ! सिद्धार्थ शुक्ला करायचा मारहाण, शिल्पा शिंदेचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:24 IST

Bigg Boss 13 : शिल्पा शिंदेने सिद्धार्थ शुक्लावर केले गंभीर आरोप

बिग बॉसच्या तेरावा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यापूर्वी बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटने केलेला खुलासा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ही गोष्ट तेराव्या सीझनमधील प्रबळ स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाशी निगडीत आहे. बिग बॉस ११ची विजेती शिल्पा शिंदेची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे ज्यात ती फोनवर सिद्धार्थसोबत बोलते आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शिंदेने शेअर केलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये सिद्धार्थ शिल्पाला विचारतोय की तुला माझ्यासोबत नात्यात रहायचं आहे की नाही. फोनवर स्पष्ट आवाज येत नव्हती त्यानंतर वेबसाइटने शिल्पा शिंदेसोबत याबद्दल बातचीत केली.

त्यावेळी शिल्पाने खळबळजनक खुलासा केला की, हो मी सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशीपमध्ये होती. नात्यात असतानाही सिद्धार्थला खूप राग यायचा आणि तो खूप शिव्या द्यायचा. तो माझ्याबाबतीत खूप पझेसिव्ह होता आणि मला नेहमीच मारहाण करत होता.

शिल्पा पुढे म्हणाली की, मला असे वाटतं की तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होणार आहे. त्याने जिंकावं असं मला अजिबात वाटत नाही. सिद्धार्थ सारख्या व्यक्तीने हा शो जिंकला नाही पाहिजे. त्यामुळे काहीही वाईट होणार नाही. बिग बॉसची ट्रॉफी त्याच्यासारख्या लोकांसाठी नाही आहे. 

यापूर्वी शिल्पाने आसिम आवडता स्पर्धक असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, शोमध्ये असे बरेच कंटेस्टंट आहेत ज्यांना लोक चांगले ओळखतात. सिद्धार्थ, रश्मी यांनी मालिकेत काम केले आहे. आसिमला लोक जास्त ओळखथ नव्हते. मात्र तो ज्यापद्धतीने घरात खेळतो आहे ते बेस्ट आहे.

बिग बॉस १३मध्ये पाहुणी म्हणून शिल्पा शिंदे आली नाही म्हणून तिने निर्मात्यांवर आरोप लावले होते. शिल्पा म्हणाली की, हो. निर्मात्यांनी मला पाहुणी म्हणून शोमध्ये येण्यासाठी संपर्क केला होता. मात्र मी त्यांच्या अटींसोबत सहमत नाही. मागील सीझनमध्ये निर्मात्यांनी मला विकास गुप्तासोबत घरात पाठवून मुर्ख बनविले होते. ज्यामुळे मला त्रास झाला होता.

टॅग्स :बिग बॉससिद्धार्थ शुक्लारश्मी देसाईआसिम रियाजशिल्पा शिंदे