Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच घडणार ही धक्कादायक गोष्ट, बिग बॉस फॅन्सना बसणार शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:18 IST

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस 13 मध्ये एक स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाला मारताना दिसणार आहे.

ठळक मुद्देकेवळ विशाल आणि मधुरिमामध्येच नव्हे तर सिद्धार्थ आणि एका स्पर्धकामध्ये देखील भांडणं होणार आहे. सिद्धार्थची अतिशय चांगली मैत्रीण शहनाज त्याच्या कानाखाली वाजवणार आहे.

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सिझनमध्ये न घडलेली गोष्ट या सिझनमध्ये घडणार असून आजचा बिग बॉसचा भाग पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसेल यात काहीच शंका नाही. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस 13 मध्ये एक स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकाला मारताना दिसणार आहे.

बिग बॉस 13 मध्ये आतापर्यंत स्पर्धकांमुळे अनेक टास्क रद्द झालेले आहेत. तसेच स्पर्धकांमध्ये धक्काबुक्की होत असल्याचे पाहायला मिळाले होते. यावरून स्पर्धकांना बिग बॉसने दंड देखील ठोठावला होता. पण आता बिग बॉस 13 चा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोत मधुरिमा आणि विशाल यांच्यामध्ये एका कपावरून भांडण होताना दिसणार आहे. पण हे भांडण इतके शिगेला पोहोचणार आहे की, मधुरिमा तिची चप्पल काढूल विशालवर फेकणार आहे. यावरून विशाल प्रचंड चिडणार असून बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बोलवावे यासाठी बिग बॉसकडे सतत मागणी करणार आहे.

विशालचे ऐकून बिग बॉस मधुरिमा आणि विशाला यांना कन्फेशन रूममध्ये बोलावणार असून विशाल बिग बॉसकडे एक मागणी करणार आहे. आजच्या घटनेनंतर मधुरिमा आणि माझ्यापैकी कोणी एकच या घरात राहू शकतो असे तो बिग बॉसला सांगणार आहे. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे प्रेक्षकांना आज कळणार आहे.

केवळ विशाल आणि मधुरिमामध्येच नव्हे तर सिद्धार्थ आणि एका स्पर्धकामध्ये देखील भांडणं होणार आहे. सिद्धार्थची अतिशय चांगली मैत्रीण शहनाज त्याच्या कानाखाली वाजवणार आहे. प्रोमामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, सिद्धार्थ शहनाजला सतत बोलत आहे की, तिच्या मनात माहिराविषयी इर्ष्या आहे तर शहनाज असे काहीच नसल्याचे सिद्धार्थला समजवणार आहे. पण सिद्धार्थ माहिराला जाऊन बोलणार आहे की, घरात तू सगळ्यात चांगली मुलगी असून लोक तुझ्यावर जळतात. पण हे ऐकून शहनाजला राग येणार असून ती सिद्धार्थवर भडकणार आहे. ती सिद्धार्थला म्हणणार आहे की, तू माझे डोके का फिरवत आहेस, मला का सतत सतवत आहेस. शहनाज रागाच्या भरात सिद्धार्थच्या कानाखाली मारणार असून आता यावर सिद्धार्थ काय प्रतिक्रिया देतो हे आपल्याला आज पाहायला मिळेल. 

टॅग्स :बिग बॉसबिग बॉस