Join us

Bigg Boss १३ : आता बिग बॉससाठी १३ कोटी नाही तर इतके कोटी घेणार सलमान, ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:52 IST

सलमान खानला बिग बॉस १३च्या सूत्रसंचालनासाठी प्रत्येक आठवड्याला १३ कोटी रुपये मानधन दिले जात होते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त शो बिग बॉस १३ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या शो टीआरपीच्या शर्यतीतही अग्रेसर आहे. प्रेक्षकांचा शोला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी हा सीझन पाच आठवडे आणखीन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास १०० दिवस चालणारा बिग बॉस शो आता पाच आठवडे आणखीन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या शोचा सूत्रसंचालक सलमान खान प्रत्येक आठवड्यासाठी आधीच्या मानधनासोबत आणखीन दोन कोटी एक्स्ट्रा घेणार आहे. 

सलमान खानला बिग बॉस १३च्या सूत्रसंचालनासाठी प्रत्येक आठवड्याला १३ कोटी रुपये मानधन दिले जात होते. मात्र आता त्याला १५ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. अशाप्रकारे सलमानला पाच आठवड्यांसाठी ७५ कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे.

ही माहिती बिग बॉस खबरीच्या इंस्टाग्राम पोस्टवरून मिळाली आहे. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. बिग बॉस खबरीच्या नुसार, सलमान खानला संपूर्ण सीझनसाठी २७० कोटी रुपये दिले जाणार आहेत. 

बिग बॉस शो सध्या इंटरेस्टिंग होतो आहे. हळूहळू सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाई यांच्यामध्ये सर्व काही नीट होत आहे. एका टास्क दरम्यान त्या दोघांनी रोमँटिक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओचं दिग्दर्शन शहनाज गिलने केलं होतं. सिद्धार्थ व रश्मीचा हा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना खूप भावतो आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस