Join us

Bigg Boss 13 : सलमानने फुकट नाही घासलीत ‘बिग बॉस’च्या घरातील भांडी, घेतले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:03 IST

सलमानला बिग बॉसच्या घरातील भांडी घासण्यापासून तर टॉयलेट स्वच्छ करताना पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण ...

ठळक मुद्दे बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही हिमांशी आसिम रियाजला पाठिंबा देताना दिसत आहे. यामुळेही ती चर्चेत आहे. 

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’चा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. होय, खुद्द बिग बॉसचा होस्ट सलमान खान घरातील मंडळींची उष्टी भांडी घासताना दिसला होता. सलमानला बिग बॉसच्या घरातील भांडी घासण्यापासून तर टॉयलेट स्वच्छ करताना पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण आता हा सगळा ड्रामा असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द ‘बिग बॉस 13’मधून बाहेर पडलेली हिमांशी खुराणा हिने हा धक्कादायक दावा केला आहे. हिमांशी खुराणाने या शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. नुकताच तिचा घरातील प्रवास संपला. पण घरातून बाहेर पडल्या पडल्या हिमांशीने  होस्ट सलमान खान बद्दल  एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.

होय, बिग बॉसच्या घरात सलमान खानने भांडी घासली, हा नुसता एक ड्रामा होता, असे हिमांशीने म्हटले आहे. विशेष म्हणजे, यासाठी सलमानला 630 कोटी मिळाल्याचा दावाही तिने केला आहे. मागच्या आठवड्यात घरात वाद झाल्यानंतर सर्वच स्पर्धकांनी आपआपली ड्यूटी करण्यास नकार दिला होता. अखेर संतापलेल्या सलमानने स्वत: बिग बॉसच्या घरात  जाऊन साफसफाई केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता. घरातील भांडी घासणे, झाडू मारणे इतकेच नाही तर अगदी टॉयलेटची सफाई   करताना तो दिसला होता. पण हिमांशीच्या मते, हा नुसता ड्रामा होता.

तूर्तास सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हिमांशी खुराणा एका सलूनमध्ये बसलेली असून तिच्या फ्रेंड्ससोबत बिग बॉस बद्दल चर्चा करताना दिसत आहे. यावेळी सलमानने मागच्या आठवड्यात घरात भांडी घासली. ड्रामा चांगला होता, असे तिचा मित्र तिला म्हणतो. त्यावर या ड्रामाचे त्याला 630 कोटी मिळाले, असे हिमांशी म्हणते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही हिमांशी आसिम रियाजला पाठिंबा देताना दिसत आहे. यामुळेही ती चर्चेत आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉस