Join us

Bigg Boss 13: बालपणीच हरपले आईवडिलांचे छत्र, या सदस्याच्या गोष्टी ऐकून व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 20:09 IST

बिग बॉसच्या घरातील या सदस्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

बिग बॉस १३मधील कंटेस्टंटमध्ये घरात टिकून राहण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. शनिवारी व रविवारी सलमान खानने घरातल्या लोकांचे क्लासदेखील घेतली. या शोमधील एक स्पर्धक तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ही स्पर्धक म्हणजे आरती सिंग. आरती कॉमेडिन कृष्णा अभिषेकची बहिण व गोविंदाची भाची आहे. 

काही दिवसांपूर्वी तिने घरातील सदस्यांशी बोलताना सांगितलं की, काम मिळत नव्हतं म्हणून डिप्रेशनमध्ये गेली होती. आता कलर्स वाहिनीने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आरती सिंग शहनाज गिलला आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगताना दिसते आहे. तिने सांगितलं की, तिला कधी आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे ती स्वतःपेक्षा दुसऱ्यांवर जास्त प्रेम करते. आरती सिंग म्हणाली की, मी कधीच स्वतःवर प्रेम केलं नाही. मी बालपणापासून वडीलांशिवाय राहत आहे. मी वेगळी राहतेय. मला कधीच त्यांचे प्रेम किंवा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे मी स्वतःपेक्षा दुसऱ्यांवर जास्त प्रेम करते.

ती पुढे म्हणाली की, माझा जन्म झाल्यावर आईचं निधन झालं. तिला कॅन्सर होता. तिच्या बेस्ट फ्रेंडने मला दत्तक घेतले. कृष्णा माझा सख्खा भाऊ आहे. तो दिड वर्षाचा होता. माझे वडील आमच्या दोघांचे संगोपन करू शकत नव्हते. मी लखनऊला गेले. माझ्या आईच्या बेस्ट फ्रेंडने मला लहानाचं मोठं केलं.

मी त्यांच्याकडे गेली तेव्हा पाच वर्षांचे होते. तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. मला भीती वाटते की मला कोणी सोडून तर जाणार नाही ना. त्यामुळे मी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांवर प्रेम करते. 

टॅग्स :बिग बॉसआरती सिंगगोविंदा