Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13: यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार हे सेलेब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:05 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त हिंदी शो 'बिग बॉस'चा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझनमधील कलाकारांचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त हिंदी शो 'बिग बॉस'चा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझनमधील कलाकारांचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील काही सेलेब्स बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता चंकी पांडे 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेणार असं बोललं जात होतं. आपल्या अचूक विनोदी टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेला बिग बॉसच्या निर्मात्यांनी अ‍ॅप्रोच केले होते. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंकी पांडे बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तयार आहेत.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा गौर, मेघना गुलजार व जायरा वसीम हे देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप या वृत्ताला अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही.

मात्र छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धी डोगरा व पवित्रा पुनिया बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. 'बालिका वधू' फेम सिद्धार्थ शुक्ला देखील बिग बॉसच्या घरात दिसू शकते.सिद्धार्थने 'बालिका वधू', 'खतरों के खिलाडी' व 'दिल से दिल तक' यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. 

हिंदी बिग बॉसचे आतापर्यंतचे बारा सीझनचं चित्रीकरण लोणावळा येथे पार पडले होते. मात्र यंदाच्या सीझनचे चित्रीकरण मुंबईत होणार आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे बिग बॉसचा सेट बनवला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफसलमान खानसोबत बिग बॉसच्या तेराव्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहे. चंकी पांडे यांच्या व्यतिरिक्त झरीन खानदेखील दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत नाही.

टॅग्स :बिग बॉससलमान खानकतरिना कैफ