Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12: मधून नेहा पेंडसेच्या एक्झिटनंतर ही मराठमोळी अभिनेत्री करणार एंट्री, घर बनणार भांडणाचा आखाडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 07:15 IST

नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असली तरी आता आणखी एक मराठी चेहरा बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे.

'बिग बॉस १२' मधून मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिची एक्झिट झाली. नेहाच्या अचानक एक्झिटमुळे नेहाच्या फॅन्सना धक्का बसला. बिग बॉस शोच्या निर्मात्यांकडून मिळत असलेल्या मानधनाच्या तुलनेत नेहा शोसाठी काहीच मसाला देत नसल्याने तिची एक्झिट झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे अशारितीने नेहा घरातून बाहेर पडल्याने मराठी रसिक नाराज झाले. मात्र नेहा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असली तरी आता आणखी एक मराठी चेहरा बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे. या व्यक्तीसाठी बिग बॉस हा शो, त्याचं स्वरूप, घरातले वाद, भांडणं काही नवीन नाही. मराठी रसिकांना हे नाव चांगलंच माहिती आहे. हे नाव म्हणजे मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडे. 

मराठी बिग बॉसमध्ये आपल्या कुशल खेळीने मेघाने साऱ्यांनाच चकीत केले होतं. आता हिच मेघा 'बिग बॉस १२' या हिंदी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री करणार आहे. नेहा हा मराठी चेहरा घरातून बाहेर गेल्याने बिग बॉस-१२ ची ही नवी खेळी असल्याचे बोललं जात आहे. मराठी बिग बॉसमध्ये सई, पुष्करसह मेघाची जोडी चांगलीच जमली होती. विविध टास्क करताना काहीही करून ते जिंकण्याची मेघाची वृत्ती रसिकांना भावली होती. आपल्या बोलण्यावर ठाम राहण्याचा तिचा स्वभाव अनेकांना भावला होता. 

मराठी बिग बॉसच्या घरात असो किंवा बाहेर सतत मेघाची चर्चा झाली. घरात असा क्वचितच कुणी स्पर्धक असेल, ज्याच्यासोबत तिचं भांडण झालं नाही. प्रत्येकावर हक्क गाजवणं, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं या स्वभावामुळं ती सर्वांच्या निशाण्यावर असायची. असं असलं तरी मेघा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसली. आता हिच मेघा हिंदी बिग बॉस गाजवण्यासाठी सज्ज आहे. इथे मेघा कशारितीने खेळते आणि डावपेच आखते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. शिवाय बिग बॉस १२मधील कोणत्या गटात ती जाणार की स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार हे पाहावं लागेल. 

टॅग्स :बिग बॉस 12बिग बॉस मराठीनेहा पेंडसे