Join us

Big Boss 16 : मला मराठी येतं, पण...; गोल्डन बॉयशी मराठीत बोलणाऱ्या Stan ला बिग बॉसची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 18:08 IST

जब मिल बैठेंगे तीन यार असं काहीसं दृश्य इथे दिसलं. जेव्हा एमसी स्टॅन, गोल्डन बॉय आणि शिव ठाकरे एकत्र आले आणि थेट मराठीतच बोलायला लागले.

Big Boss 16 : प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉस मध्ये सतत धमाल सुरु असते. प्रेक्षकही घरातील सदस्यांमधील भांडणाची मजा घेत राहतात. सध्या हिंदीबिग बॉस १६ मध्ये आता (golden boy) गोल्डन बॉयची एंट्री झाली आहे. कालच्या एपिसोडमध्ये एक वेगळीच मजा बघायला मिळाली. जब मिल बैठेंगे तीन यार असं काहीसं दृश्य इथे दिसलं. जेव्हा एमसी स्टॅन, गोल्डन बॉय आणि शिव ठाकरे एकत्र आले आणि थेट मराठीतच बोलायला लागले.

या तिघांचे मराठी संभाषण ऐकून बिग बॉस यांची प्रतिक्रिया मजेशीर आहे. बिग बॉस म्हणाले, 'स्टॅन, मराठी मला येतं पण इथे हिंदीतच बोला. '

हिंदीतील बिग बॉस 16 (Bigg Boss 16 Wild Card Entry) कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा फुल ऑन एन्टरटेन्मेंट बनला आहे. शोमधील सर्व स्पर्धक ट्रॉफीवर स्वत:चं नाव कोरण्यासाठी सज्ज झालेत आहेत. मूळचा पुण्याचा असलेला सनी नानासाहेब वाघचौरे हा गोल्डन बॉय शोचा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक बनला. मग काय सनी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना मराठीतुन बोलल्याशिवाय राहावलेच नाही. मात्र बिग बॉस यांनाही मराठी येतं हे यातुन कळालं.

टॅग्स :बिग बॉसहिंदीमराठीसोशल मीडिया