Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ - बिनधास्त हिना नेहासमोर बेधडक मांडणार तिचे ठाम मत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:25 IST

माधव आणि हिनामध्ये एका विषयावर चर्चा होत असताना तिने तिचे स्पष्ट मत मांडले.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेली हिना पांचाळने घरामध्ये काही सदस्यांची मने जिंकली तर काहींसोबत तिचे मतभेद झाले, भांडण झाली. यामध्ये वीणा आणि शिव सोबत तिचे बऱ्याच वेळेस खटके उडाले. तर माधव आणि नेहा तिचे जवळचे मित्र बनले. नेहाच्या ती जवळची मैत्रीण बनली, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट, तिला खटकणारी गोष्ट, तिने नेहाला तोडांवर सांगितली आहे, मग ते तिला खटकल तरी चालेल. आज देखील नेहा, माधव आणि हिनामध्ये एका विषयावर चर्चा होत असताना तिने तिचे स्पष्ट मत मांडले.

नेहाचे म्हणणे होते, अभिजीत आणि वैशाली जर कोणामध्ये भांडण झाले असेल तर ते अजून वाढविण्याचा प्रयत्न करतात आपण ते पण करुया नको. लोकांच्या कोणत्याच गोष्टीमध्ये आपण पडायचे नाही. नेहा पुढे म्हणाली, जर त्यांचे भांडण झाले आहे तर त्यांचे त्यांना मिटवू दे, कोणाच्याही मध्ये जाऊ नका. त्यावर हिनाने स्पष्टीकरण दिले, “मी नाही जात कोणाच्यामध्ये, समोरचा माणूस जर येत असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. मला अस वाटतं, जर त्यांना वाटत आहे बोलायचे आहे तर त्यांना बोलू दे. घरामध्ये जर कोणाला एकट वाटत आहे किंवा त्याला एकट पाडलं जात असेल तर मी त्याच्याकडे जाणार बोलायला. त्या माणसाशी पाच मिनीट बोलले तर माझ काहीच बिघडणार नाहीये”. कालच नेहाचे हिनाला म्हणणे होते कि, मी कधीच तुला वा कोणाला सांगत नाही कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही, तर मला सगळे का म्हणतात मी डॉमिनेटीग आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीहिना पांचाळनेहा शितोळे