Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाखरवडी या मालिकेतील भक्‍ती राठोडने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:48 IST

भाखरवडी या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी भक्‍ती राठोड ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची अनेक वर्षांपासून चाहती असल्याने या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना तिला खूपच आनंद होत आहे

ठळक मुद्देया मालिकेच्या सेटवर कलाकार एका कुटुंबाप्रमाणेच राहातात. त्यामुळेच आम्‍ही सर्व कलाकारांनी एकत्र अनेक सीन्‍सचे शूटिंग केले नसले तरी आमच्‍यामध्‍ये खूप घट्ट नाते आणि केमिस्‍ट्री निर्माण झाली आहे. ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची खासियत आहे असे मला वाटते.

भाखरवडी ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत देवेन भोजानी, परेश गणंत्रा मुख्य भूमिकेत असून प्रेक्षकांना त्यांचे काम चांगलेच आवडत आहे. या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी भक्‍ती राठोड ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची अनेक वर्षांपासून चाहती असल्याने या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना तिला खूपच आनंद होत आहे. 

याविषयी ती सांगते, एक प्रेक्षक म्‍हणून मी 'हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍स'ची मोठी चाहती आहे. ते नेहमीच अनोख्‍या विनोदी मालिका सादर करतात. ते अनोख्‍या संकल्‍पना घेऊन येतात. आता मी या टीमचा भाग बनली आहे याचा मला आनंद होत आहे. या मालिकेच्या सेटवर कलाकार एका कुटुंबाप्रमाणेच राहातात. त्यामुळेच आम्‍ही सर्व कलाकारांनी एकत्र अनेक सीन्‍सचे शूटिंग केले नसले तरी आमच्‍यामध्‍ये खूप घट्ट नाते आणि केमिस्‍ट्री निर्माण झाली आहे. ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची खासियत आहे असे मला वाटते. मी स्‍वत: सकाळी लवकर उठण्‍याच्‍या बाबतीत आळशी आहे. पण सध्‍या मी सकाळी लवकर उठून सेटवर जाण्‍यासाठी उत्‍सुक असते. आम्‍ही हसत-खेळत काम करतो, आम्‍ही एकमेकांना समजून घेतो आणि सर्वोत्‍तम कामगिरी सादर होण्‍यासाठी एकमेकांना मदत करतो. या मालिकेचा सर्वात उत्‍तम भाग म्‍हणजे माझ्या पतीची भूमिका साकारणारा परेश गणात्रा. तो एक चांगला अभिनेता आहे. तो नेहमी प्रत्‍येकाला मदत करतो. म्‍हणून एक कलाकार म्‍हणून मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळते. भाखरवडी मालिकेविषयी मला विचारण्यात आले तेव्हा लगेचच मी या मालिकेसाठी होकार दिला. एक कलाकार म्‍हणून आम्‍ही नेहमीच आमचे अभिनय कौशल्‍य दाखवण्‍यास मिळेल अशा भूमिकांचा शोध घेत असतो. मी अनेक वर्षं रंगभूमीवर काम करत आहे. जेडी सर आणि आतिष सरांनी माझा अभिनय पाहिला आहे. म्‍हणून मला विश्‍वास होता की, ते मला जी भूमिका देतील ती माझ्या क्षमतेनुसार किंवा त्‍यापलीकडील असेल. त्याचमुळे मी या मालिकेत काम करण्याचा विचार केला.  

टॅग्स :भाकरवडी मालिका