Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नव्या अनीता भाभीची मालिकेत झाली ग्रॅंड एन्ट्री, स्माइल बघून तिवारीजींच्या हृदयाची वाढली धडधड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 10:37 IST

Bhabiji Ghar Par Hai : नेहा पेंडसे अनीता भाभीची भूमिका साकारत होती. तिने ही मालिक सोडली. मेकर्सनी शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आङे. ज्यात तिवारीजी नवीन अनीता भाभी पाहून अवाक् होतात. इतकंच का तर ते हवेतही उडतात.

Bhabiji Ghar Par Hai : 'भाभीजी घर पर हैं' मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आनंदी बातमी आहे. ते आता त्यांच्या नव्या अनीता भाभीला बघू शकणार आहेत. नवीन अनीता भाभी आपल्या लूक्स आणि स्माइलने तुम्हा सर्वांची झोप उडवण्यासाठी येत आहे. पॉप्युलर अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव (Vidisha Shrivastav) ही भूमिका साकारणार आहे. याआधी नेहा पेंडसे अनीता भाभीची भूमिका साकारत होती. तिने ही मालिक सोडली. मेकर्सनी शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आङे. ज्यात तिवारीजी नवीन अनीता भाभी पाहून अवाक् होतात. इतकंच का तर ते हवेतही उडतात.

विदिशा श्रीवास्तवने हिंदी, तेलुगू, मल्याळमसहीत अनेक भाषेतील सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मेकर्सनी या मालिकेत तिला नवीन अनीता भाभी म्हणून आणलं आहे. भारतात अनीता भाभीचे अनेक फॅन्स आहेत. आता हे बघावं लागेल की, या नव्या अनीता भाभीला चाहत्यांचं किती प्रेम मिळतं. ही भूमिका साकारण्यावरून विदिशा म्हणाली होती की, मी हा शो रोज बघते, याची अजिबात कल्पना नव्हती की, अनीता भाभीची भूमिका साकारायला मिळेल.

विदिशा म्हणाली की, 'हा माझ्यासाठी फारच शानदार स्टेटमेंट आहे. हे मोठी जबाबदारी घेऊन मी टॅलेंटेड कलाकार आसिफ शेख, शुभांगी अत्रे आणि रोहिताश्व गौरसोबत काम करणार आहे. संजय आणि बिनाइफरचे नमी धन्यवाद देते की, त्यांनी मला ही भूमिका दिली. मी नशीबवान आहे'.

मेकर्सनी नव्या अनीता भाभीच्या ग्रॅंड एन्ट्रीचा व्हिडीओ शेअऱ केला आहे. जो फारच प्रॉमिसिंग वाटत आहे. चेहऱ्यावर स्माइल आणि गुलाबी रंगाच्या साडीतील अनीता भाभीचा अंदाज पाहून तिवारीजी भारावून गेले आहेत. प्रेक्षकही त्यांच्या नव्या अनीता भाभीला बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

टॅग्स :भाभीजी घर पर हैटेलिव्हिजन