Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाभीजी... फेम Deepesh Bhanच्या कुटुंबाच्या मदतीला धावून आली सौम्या टंडन, ५० लाखांचं फेडलं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:18 IST

भाभीजी घर पर है फेम दीपेश भान यांच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या त्याच्या बायकोच्या डोक्यावरचं ५० लाखांचं कर्ज फेडण्यास सौम्याने मदत केली.

'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय कॉमेडी शोचा अभिनेता दीपेश भानच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. दिपेश भान यांनी 23 जुलै 2022 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं.  त्याच्या जाण्याने त्याची पत्नी मानसिक आणि आर्थिक दोन्ही दृष्ट्या खचली होती. यावेळी सिरीयल मध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन पुढे आली आणि तिने स्वत:हून दीपकने घेतलेलं 50 लाखांचं गृह कर्ज फेडून त्याच्या पत्नीला नवीन सुरुवात करण्यास मदत केली. 

दिपेश भान यांच्या निधनानंतर त्याच्या दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी त्याच्या पत्नीवर आली होती. याशिवाय ५० लाखांच्या गृहकर्ज कुटुंबावर आलं. काही काळापूर्वी 'भाबीजी घर पर हैं' या शोमध्ये अभिनेत्री सौम्या टंडननेही याचा उल्लेख केला होता. आता सौम्यानेच दीपेश भानची पत्नी आणि कुटुंबाची मदत करत ते कर्ज फेडलं आहे. 

दीपेश भान यांच्या पत्नीने एक व्हिडिओ शेअर करून सांगितले आहे की, सौम्या टंडनच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांनी अवघ्या एका महिन्यात गृहकर्जाची परतफेड केली आहे. सौम्या टंडनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपेश भानच्या कुटुंबासाठी मदत मागितली होती. यावेळी तिने दीपेश भानच्या कुटुंबावर लाखोंचे कर्ज आहे ते फेडण्यासाठी तिने  लोकांना मदत करण्याचे आवाहन केलं होते.

दिवंगत अभिनेते दीपेश भानच्या इन्स्टाग्राम हँडलवरून त्याच्या पत्नीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या कुटुंबाची कर्ज फिटल्याचे सांगताना दिसत आहे. तिने सौम्या टंडनचेही आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने हेही सांगितले की, सौम्या आणि भाबीजी शोचे निर्माते  बेनिफर कोहलीनेही तिला मदत केली आहे. या दोघांमुळे ती लाखोंच्या कर्जाची परतफेड करू शकली आहे. 

टॅग्स :भाभीजी घर पर हैटिव्ही कलाकार