Join us  

मालिकेतील लग्नात इतका खतरनाक ट्विस्ट तुम्ही कधीच पाहिला नसेल, पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 5:25 PM

Social Viral : या मालिकेतील लग्नाच्या सेगमेंटमध्ये असा ट्विस्ट टाकण्यात आला की, सोशल मीडियावरील लोक याची खिल्ली उडवत आहेत. या लग्नाच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टीव्ही मालिकांच्या दुनियेत कल्पनांना काही लिमिट नसतं. कधीही काहीही दाखवलं जाऊ शकतं. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी, त्यांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये खतरनाक ट्विस्ट दाखवले जातात. असे ट्विस्ट खासकरून लग्नाच्या सीनमध्ये जास्त असतात. एका बंगाली मालिकेतील असाच एक सीन सध्या व्हायरल झाला आहे.

या मालिकेतील लग्नाच्या सेगमेंटमध्ये असा ट्विस्ट टाकण्यात आला की, सोशल मीडियावरील लोक याची खिल्ली उडवत आहेत. या लग्नाच्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा सीन इतका फनी आहे की, तुम्ही पोट धरून हसू लागाल. सीन असा आहे की, लग्न सुरू आहे. नवरी-नवरदेव एकमेकांच्या गळ्यात हार घालणार आहेत. अशात अचानक मागून एक तरूण नवरदेवाला धक्का देतो. इथेच सर्वात मोठा ट्विस्ट येतो. जो बघून सगळे लोक हैराण होतात. धक्का दिल्यावर नवरदेव एका बाजूला जातो आणि नवरी त्याच्याऐवजी धक्का देणाऱ्या तरूणाच्या गळ्यात हार टाकते.

आहे ना जबरदस्त ट्विस्ट....यानंतर ज्याच्या गळ्यात चुकून हार टाकला जातो तो तरूण नवरदेवाच्या हातातील हार घेतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो. हे इतक्यावरच थांबतं असं नाही. या लग्नात आणखी धमाका बाकी आहे. लग्नातील लोकांकडे पाहिलं तर वाटतं की, त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तरूण नवरीच्या भांगेत कुंकू भरतो. हे बघून खरा नवरदेव आणि लोक शॉक्ड होतात. 

शंबर टक्के तुम्ही याआधी कोणत्याही मालिकेत इतका खतरनाक ट्विस्ट पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून लोक पोटधरून हसत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, विचार करा की, फोटोग्राफरचं काय होणार....आता त्यांना एक्स्ट्रा फी घ्यावी लागेल.  

टॅग्स :टेलिव्हिजनसोशल व्हायरल