Join us

बार्बी इन ब्लॅक! दिवसेंदिवस बोल्ड होतीये ऋतुजा बागवे; नव्या लूकला दिला हॉटनेसचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:14 IST

Rutuja Bagwe:गेल्या काही काळापासून ऋतुजाचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये तिचा वावर आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही तितकीच असल्याचं दिसून येतं. गेल्या काही काळापासून ऋतुजाचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे. यामध्येच सध्या तिची एक पोस्ट चर्चेत येत आहे.

अलिकडेच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लॅक रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा हा लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

ऋतुजा या लूकमध्ये कमालीची बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसत आहे. त्यामुळे तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. बार्बी इन ब्लॅक असं म्हणत अभिनेत्री दिप्ती केतकरने तिचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी तिला हॉट म्हटलं आहे. दरम्यान, ऋतुजाने 'नांदा सौख्य भरे', चंद्र आहे साक्षीला' अशा कितीतरी मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :ऋतुजा बागवेसेलिब्रिटीटेलिव्हिजन