छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'बालिका वधू' (balika vadhu). उत्तम कथा आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच गाजली. विशेष म्हणजे आजही या मालिकेतील कलाकारांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. बालिका वधूमधील आनंदी आणि जगदीश या जोडीला नेटकऱ्यांनी खासकरुन प्रेम दिलं. विशेष म्हणजे मालिकेतील जगिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बालिका वधू'मधील तरुणपणीच्या जगदीशची भूमिका अभिनेता शशांक व्यास याने साकारली होती. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यामुळे तो अल्पावधीत लोकप्रिय झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून तो टीव्ही विश्वापासून दूर गेला होता. परंतु, आता ७ वर्षानंतर त्याने पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शशांक सात वर्षानंतर एका सुपरनॅच्युरल थ्रिलर मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत तो एका नव्या अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, २०१९ मध्ये बालिका वधू ही मालिका ऑफ एअर झाली. त्यानंतर शशांक कोणत्याही मालिकेत झळकला नाही. मात्र, ७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
Web Summary : Shashank Vyas, known as Jagya from 'Balika Vadhu,' returns to television after seven years. He will star in a supernatural thriller, marking his comeback after a long absence since the show ended in 2019. Fans eagerly anticipate his new role.
Web Summary : 'बालिका वधू' फेम शशांक व्यास, जो जग्या के नाम से जाने जाते हैं, सात साल बाद टेलीविजन पर वापसी कर रहे हैं। वे एक सुपरनैचुरल थ्रिलर में अभिनय करेंगे, जो 2019 में शो खत्म होने के बाद उनकी वापसी है। प्रशंसक बेसब्री से उनकी नई भूमिका का इंतजार कर रहे हैं।