Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बालिका वधू'फेम अभिनेत्री शार्क टँकमध्ये पोहोचली, महिलांसाठी आणलं खास प्रोडक्ट; जज म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:11 IST

शार्क्सने अभिनेत्रीवर केली प्रश्नांची सरबत्ती

'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत गहनाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री नेहा मर्दा सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वीच नेहाने अभिनयातून ब्रेक घेतला. २०१२ साली तिने बिझनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी तिला मुलगी झाली. यामुळे नेहा चर्चेत आली होती. तर आता नेहा थेट शार्क टँकमध्ये दिसली आहे. 

नेहा मर्दाने काही महिन्यांपूर्वीच व्यवसायात प्रवेश केला. तिने 'फिटकू' हे पर्सनल केअर ब्रँड सुरु केलं. शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये नेहाने तिच्या स्टार्टअपसाठी हजेरी लावली. तिने आपला 'फिटकू' हा महिलांसाठी तयार केलेला बॉडी ओडर अंडरआर्म रोल ऑन आहे. तिने आपला हा स्टार्टअप ब्रँड शार्क टँकच्या मंचावर सादर केला. तिने यावेळी तिच्या ब्रँडचं वैशिष्ट्यही सांगितलं. स्वत:चाच अनुभव सांगत ती म्हणाली, "माझ्या प्रेग्नंसीनंतर मला माझ्या शरिराबद्दलच किळस वाटायला लागली. शरिराला वास यायचा. अभिनेत्री म्हणून माझा आत्मविश्वासच तुटला होता. कोणतीच गोष्ट काम करत नव्हती. दुर्गंधी कमी करण्यासाठी तिने हा रोल ऑन आणला. मात्र शार्क्सने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आता त्याला नेहा काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं आहे.  

या प्रोडक्टला वासच येत नाहीये, याचा अर्थ काय?,'याची किंमत ९९९ रुपये आहे, लोकांना हे खरंच परवडेल का?','सेलिब्रिटीला घेऊन प्रोडक्ट जास्तीत विकण्याची ही स्ट्रॅटेजी आहे का? असे प्रश्न शार्क्सने विचारले. तर दुसरीकडे नेहाच्या टीमने २ लाख प्रोडक्ट्स आतापर्यंत विकले असल्याचा दावा केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Balika Vadhu' actress enters Shark Tank with women's product.

Web Summary : Neha Marda, known from 'Balika Vadhu', pitched her women's hygiene brand 'Fitko' on Shark Tank. Addressing body odor concerns post-pregnancy, she faced tough questions about pricing and strategy from the Sharks. Her team claims 200,000 units sold.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनव्यवसाय