Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:48 IST

कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा?

'बालिका वधू' मालिकेत छोट्या आनंदीची भूमिका साकारलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor). अविकाने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बॉयफ्रेंडसोबत तिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून अविका मिलिंद चंदवानीला डेट करत होती. आता दोघांनी नातं पुढे नेण्याचं ठरवलं आहे. मिलिंदने अविकाला प्रपोज केलं असून तिनेही होकार दिला आहे. अविकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री अविका गौरने नुकतीच सोशल मीडियावर आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या साखरपुड्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. बेबी पिंक साडीत ती खूप सुंदर दिसत आहे. तर तिचा होणारा नवरा मिलिंद चंदवानीही मॅचिंग ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसत आहे. दोघांची जोडी फारच गोड दिसत आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "त्याने मला प्रपोज केलं...मी हसले, मग रडले आणि जोरात ओरडून हो म्हणाले. मी पूर्ण फिल्मी आहे. बॅकग्राऊंड म्युझिक, स्लो मोशन ड्रीम्स, मस्कारा उतरतोय वगरे...तर तो एकदम समजूतदार, शांत आणि प्रत्येक ठिकाणी फर्स्ट-एड-किट घेऊन जाणाऱ्या टाईपचा आहे. मला ड्रामा आवडतो आणि तो माझा ड्रामा झेलतो. आणि अशा प्रकारे आम्ही एकमेकांसाठीच आहोत याची जाणीव होते."

ती पुढे लिहिते,"त्याने जेव्हा मला मागणी घातली तेव्हा माझ्यातली हिरोईन जागी झाली...डोळ्यात पाणी आणि डोक्यात झिरो नेटवर्क..कारण खरं प्रेम? ते नेहमी परफेक्ट असेलच असं नाही. पण ते कायम जादुई असतं."

कोण आहे मिलिंद चंदवानी?

अविका गौरचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी 'कॅम्प डायरीज' या एनजीओचा संस्थापक आहे. याच एनजीओच्या एका इव्हेंटवेळी त्याची आणि अविकाची भेट झाली होती. २०१९ मध्ये त्याने 'एमटीव्ही रोडिज रिअल हिरोज'मध्येही सहभाग घेतला होता.

'बालिका वधू' ही मालिका १७ वर्षांपूर्वी २००८ साली आली होती. या मालिकेतील आनंदी या भूमिकेतून अविका गौरला लोकप्रियता मिळाली. नंतर मोठी झाल्यावर अविकाने साऊथ, हिंदी सिनेमांमध्ये नशीब आजमावलं. गेल्या वर्षीच तिचा 'ब्लडी इश्क' सिनेमा रिलीज झाला होता.

टॅग्स :अविका गौरटिव्ही कलाकार