Join us

बबीता-टप्पूचं ‘अफेअर’ अन् जेठालालची रिअ‍ॅक्शन! सोशल मीडियावर मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 14:02 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बबिताजी आणि टप्पू एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता या चर्चांना आणखी जोर चढला आहे.

ठळक मुद्देवृत्तानुसार, मुनमुन व राज गेल्या अनेक महिन्यांपासून  एकमेकांच्या प्रेमात आहेत. डिसेंबर 2020 मध्ये या दोघांच्या डिनर डेटचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेतील बबिताजी आणि टप्पू एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. आता या चर्चांना आणखी जोर चढला आहे. होय, आता मात्र एका वेबसाईटने या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.  सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तानुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या अख्ख्या टीमला बबीता अर्थात मुनमुन दत्ता (Munmun Dutta)आणि टप्पू अर्थात राज अनादकत (Raj Anadkat) यांच्या रिलेशनशिपबद्दल ठाऊक आहे. दोघांच्या कुटुंबानाही या नात्याची कल्पना आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे तूर्तास तरी या बातमीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर तर मीम्सचा पूर आला आहे.

टप्पू हा मालिकेत जेठालालचा मुलगा दाखवण्यात आला आहे. बबीताजी व टप्पूच्या नात्याविषयी चर्चा सुरू झाल्यावर सोशल मीडियावर याच्या मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या. टप्पू व बबीताजीच्या नात्यावर जेठालालची काय प्रतिक्रिया असेल, या अनुषंगाने नेटकºयांनी एकापेक्षा एक भन्नाट मीम्स शेअर केले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिताच्या भूमिकेतून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात लोकप्रिय झाली आहे. मुनमुन दत्ताचं नाव दिलीप जोशीने अर्थात जेठालालनेच निर्मात्यांना सुचविलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी मुनमुनची बबिताच्या रोलसाठी निवड केली. मालिकेत बबिता आणि जेठालालमधील रोमांस प्रेक्षकांना खूप भावतो. पण आता हीच बबिता टप्पूवर भाळली म्हटल्यावर  जेठालालचे रिअ‍ॅक्ट होणं साहजिक आहे. तो कसा रिअ‍ॅक्ट होईल, यावरचेच मीम्स व्हायरल होत आहेत.  वृत्तानुसार, मुनमुन व राज गेल्या अनेक महिन्यांपासून  एकमेकांच्या प्रेमात आहेत. डिसेंबर 2020 मध्ये या दोघांच्या डिनर डेटचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मा