Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बालवीर' फेम अभिनेता देव जोशीने मंदिरात साध्या पद्धतीने केला साखरपुडा, चाहत्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:38 IST

बालवीर मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देव जोशीने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत साखरपुडा केला (dev joshi)

'बालवीर' ही सब टीव्हीवरील मालिका आठवतेय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना 'बालवीर' ही मालिका चांगलीच आवडली. सब टीव्हीवरील या मालिकेचे पुढे काही वेगळे सीझनही आले. याच मालिकेत 'बालवीर'ची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता देव जोशीने साखरपुडा केलाय. देवने अत्यंत साध्या अन् पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केलाय. गळ्यात रुद्राक्ष माळा घालून एका मंदिरात देव आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुडा केलाय. 

देव जोशीच्या साखरपुड्याची चर्चा

देवच्या पत्नीचं नाव आरती असून अभिनेत्याने साखरपुड्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देवने लिहिलंय की, "आणि आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. आयुष्यभरासाठी प्रेम, हसू आणि अनेक आठवणी. आम्ही साखरपुडा केलाय." अशा शब्दात देवने त्याच्या साखरपुड्याची खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. देवच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटो समोर येताच सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

गळ्यात रुद्राक्षमाळा अन्...

कपाळावर गंध आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून एका मंदिरात देवने आरतीसोबत साखरपुडा केलाय. देव जोशीला 'बालवीर' मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'हमारी देवरानी', 'काशी-अब ना रहे कर्ज तेरा', 'देवो के देव महादेव' अशा मालिकांमधूनही देवने काम केलं होतं. अगदी लहान वयापासून काम केल्यामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात देव लोकप्रिय आहे. देव लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन