Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ऑल द बेस्ट'मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले - संजय नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 08:00 IST

संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात.

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसेच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला.

शुक्रवारच्या भागात अभिनेता संजय नार्वेकर कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहेत. संजय नार्वेकर यांनी नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. ऑल द बेस्ट या नाटकामुळे कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली. हे नाटक कलाकारांनी फुलवले. ८व्या प्रयोगापासून या नाटकाला जो हाऊसफुलचा बोर्ड लागला तो नाटकाच्या शेवटच्या प्रयोगापर्यंत होता. इतकंच नव्हे तर ३६५ दिवसात या नाटकाचे ४५२ प्रयोग झाले. या नाटकाचे चाहते देखील अनेक आहेत. या चाहत्यांबद्दलचा किस्सा शेअर करताना संजय म्हणाले, "शिवाजी मंदिरला एक चाहता यायचा प्रयोगाला आणि त्याने जवळ जवळ १०० ते १५० प्रयोगांना हजेरी लावली. विशेष म्हणजे तो चाहता कर्णबधिर होता पण त्याच आमच्यावरचं प्रेम इतकं होतं कि तो पुन्हा पुन्हा नाटकाला यायचा. इतकंच नव्हे तर त्याने ५०, १००, १५० प्रयोगाच्या वेळी पेढे देखील वाटले."असे अनेक किस्से ऐकण्यासाठी पाहायला विसरू नका कानाला खडा शुक्रवारी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

टॅग्स :कानाला खडाकलर्स मराठी